देसाई-पाटणकर गटातच फायनल

By admin | Published: February 13, 2017 10:48 PM2017-02-13T22:48:55+5:302017-02-13T22:48:55+5:30

पाटण तालुक्यात बंडखोरी मावळली ; गटातून २४ तर गणातून ३८ उमेदवारांची माघार

Final in Desai-Patankar group | देसाई-पाटणकर गटातच फायनल

देसाई-पाटणकर गटातच फायनल

Next



पाटण : तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारी दिवशी जिल्हा परिषद गटातून एकूण २४ तर पंचायत समिती गणातनू एकूण ३८ जणांनी माघार घेतली. आता शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी कॉँग्रेस व इतर पक्ष असा मुख्यत्वे चौरंगी लढतीचा महासंग्राम पाहावयास मिळणार असून, फायनल देसाई-पाटणकर गटातच होणार असे दिसते. काळगाव गणातील अपक्ष उमेदवार पांडुरंग कुंभार हे उमेदवारी अर्ज बाद झाल्याच्या कारणावरून न्यायालयात गेल्यामुळे त्या गणातील अर्ज माघारीची प्रक्रिया १५ फेबु्रवारी रोजी होणार आहे.
गट व गणनिहाय अंतिम उमेदवारी यादी पुढीलप्रमाणे : गोकूळ तर्फ हेळवाक गट- सर्जेराव कांबळे (अपक्ष), बापू जाधव (राष्ट्रवादी), संजय जाधव (शिवसेना). गोकूळ तर्फ हेळवाक गण- किसन कांबळे (भाजपा), बबन कांबळे (राष्ट्रवादी), शिवाजी कांबळे (बसपा), चंद्रकांत मोहिते (कॉँग्रेस), सुनील कदम (शिवसेना). शिरळ गण- राजाराम शेलार (राष्ट्रवादी), विलास गुरव (अपक्ष), भागुजी शेळके (शिवसेना), जयवंत सुतार (भाजपा), बबन सुतार (अपक्ष). तारळे गट- संगीता खबाले-पाटील (राष्ट्रवादी), सुवर्णा निकम (भाजपा), कांचन खामकर (काँग्रेस), सुजाता पाटील (शिवसेना). तारळे गण- रेश्मा जाधव (राष्ट्रवादी), संगीता जाधव (शिवसेना), सावित्रा लाहोटी (भाजपा), वनिता पाटील (कॉँग्रेस). मुरुड गण- सोमनाथ काळकुटे (अपक्ष), नितीन जाधव (भाजपा), विलास देशमुख (राष्ट्रवादी), वसंतराव पाटील (कॉँग्रेस), विजय पवार (शिवसेना), शहाजी सोनावले (बंडखोर सेना). म्हावशी गट- ज्ञानदेव गावडे (अपक्ष), राजेश पवार (राष्ट्रवादी), संजय भोसले (भाजपा), पांडुरंग यादव (कॉँग्रेस), विजयसिंह पाटील (शिवसेना). म्हावशी गण- वनिता कुंभार (कॉँग्रेस), उज्ज्वला लोहार (राष्ट्रवादी), विमल सुतार (शिवसेना). चाफळ गण- वैशाली जाधव (शिवसेना), रूपाली पवार (राष्ट्रवादी), जयश्री पाटील (कॉँग्रेस).
मल्हारपेठ गट - भानुप्रताप कदम (शिवसेना), विजय पवार (पाविआ), विजय कवर (भाजपा), अविनाश पाटील (राष्ट्रवादी), रामचंद्र पानस्कर (कॉँग्रेस). मल्हारपेठ गण- नारायण चव्हाण (कॉँग्रेस), शंकर शेडगे (राष्ट्रवादी), शिवाजी पानस्कर (भाजपा), सुरेश पानस्कर (पाविआ), किरण नलवडे (अपक्ष). नाडे गण- प्रियांका कुंभार (कॉँग्रेस), सुभद्रा शिरवाडकर (पाविआ), सिंधुताई लोहार (राष्ट्रवादी), निशा शिंदे (अपक्ष). मारुल हवेली जिल्हा परिषद गट- सुग्रा खोंदू (शिवसेना), रूपाली पाटील (राष्ट्रवादी), अनिता श्रीरसागर (भाजपा), सुजाता पाटील (कॉँग्रेस). मारुल हवेली गण- गजानन कुंभार (कॉँग्रेस), संतोष गिरी (शिवसेना), दत्तात्रय गुरव (भाजपा), बापूराव गुरव (राष्ट्रवादी). नाटोशी पंचायत समिती गण- निर्मला देसाई (शिवसेना), सुनीता मोरे (राष्ट्रवादी), श्वेताली मिसाळ (भाजपा), मनीषा सुर्वे (मनसे). (प्रतिनिधी)

Web Title: Final in Desai-Patankar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.