... अखेर ‘महाभारत’ अटळ !

By admin | Published: May 18, 2016 10:20 PM2016-05-18T22:20:05+5:302016-05-19T00:14:23+5:30

आज चिन्ह वाटप : ४२ उमेदवारांची नावे अंतिम; उमेदवारांच्या पायाला भिंगरी--सांगा, जनता बँक कोणाची..?

Finally, 'Mahabharata' is inevitable! | ... अखेर ‘महाभारत’ अटळ !

... अखेर ‘महाभारत’ अटळ !

Next

सातारा : जनता सहकारी बँकेच्या निवडणुकीत अखेर दोन तुल्यबळ पॅनेल समोरासमोर ठाकले आहेत. सत्ताधारी भागधारक व परिवर्तन या दोन्ही पॅनेलने बुधवारी प्रत्येक २१ उमेदवारांची नावे अंतिम केली. एक उमेदवार अपक्ष राहिला आहे. भागधारक पॅनेलमध्ये विद्यमाने संचालक व माजी नगराध्यक्ष निशांत पाटील आणि माजी नगरसेवक वसंत लेवे या दोन नवीन उमेदवारांचा समावेश करण्यात आला.
भागधारक पॅनेलचे अंतिम उमेदवार पुढीलप्रमाणे - सर्वसाधारण गटातून १६ उमेदवार निवडून द्यायचे आहेत. त्यामध्ये पॅनेलकडून विनोद कुलकर्णी, जयेंद्र चव्हाण, अमोल मोहिते, माधव सारडा, जयवंत भोसले, चंद्रशेखर घोडके, आनंदराव कणसे, अरुणकुमार यादव, अतुल जाधव, निशांत पाटील, वसंत लेवे, रामचंद्र साठे, अविनाश बाचल, रवींद्र माने, वजीर नदाफ, नारायण ऊर्फ बाळासाहेब लोहार यांना उमेदवारी दिली आहे. महिला गटातून डॉ. चेतना माजगावकर आणि सुजाता राजेमहाडिक यांना, अनुसूचित जाती जमाती गटातून विजय बडेकर, इतर मागासवर्गीय गटातून अशोक मोने आणि विशेष मागास प्रवर्ग गटातून बाळासाहेब गोसावी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
ॠतूराज आहेरराव, महेश कुलकर्णी, रवींद्र खरात या उमेदवारांनीही माघार घेऊन भागधारक पॅनेलला पाठिंबा जाहीर केल्याचे भागधारक पॅनेलच्या वतीने अ‍ॅड. मुकुंद सारडा व विनोद कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
परिवर्तन पॅनेलतर्फे सर्वसाधारण गटातून राजन जोशी, डॉ. अच्युत गोडबोले, प्रकाश गवळी, रफिक बागवान, प्रा. डॉ. धनंजय देवी, शिरीष चिटणीस, बाळासाहेब बाबर, नरेंद्र पाटील, किशोर गोडबोले, राम हादगे, सुभाष निकम, वसंत जोशी, नासिर शेख, नीलेश महाडिक, किशोर शिंदे, प्रशांत आहेरराव यांना संधी देण्यात आली आहे. महिला प्रवर्गातून सुवर्णा पाटील, स्वाती आंबेकर यांना अनुसूचित जाती-जमातीमधून प्रकाश बडेकर, इतर मागास प्रवर्गातून श्रीकांत आंबेकर, भटक्या जाती-जमातीमधून अशोक शेडगे यांना संधी देण्यात आली आहे. दीपक आग्रवाल, शिवराम वायफळकर, राजेंद्र देशमाने, अनिकेत तपासे, प्रशांत घोरपडे, सुनीता पाटणे, प्रशांत घोरपडे, सुनीता घाटगे, महेंद्र जाधव यांनी उमेदवारी अर्ज काढून घेतले. त्यांनी परिवर्तन पॅनेलला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, दोन्ही पॅनेलच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात प्रचार मोहीम जोरदार राबविली जात आहे. मतदारांच्या प्रत्यक्षात भेटी घेऊन त्यांची मनधरणी केली जात आहे. पायाला भिंगरी लावून उमेदवार फिरताना पाहायला मिळत आहेत. (प्रतिनिधी)


शह-काटशहाचे राजकारण
शहरात नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनता बँकेच्या निमित्ताने शह-काटशहाचे राजकारण चांगले रंगले आहे. निवडणुकीमध्ये जास्तीत-जास्त लोकांचा पाठिंबा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी दोन्ही पॅनेल सक्रिय झाले असून, एकमेकांना शह देण्याची एकही संधी सत्ताधारी तसेच विरोधक सोडत नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे.

Web Title: Finally, 'Mahabharata' is inevitable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.