साताऱ्यात फायनान्स कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड; दहा जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 11:50 AM2024-10-09T11:50:01+5:302024-10-09T11:50:17+5:30
सातारा : येथील अजंठा चाैकातील एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयात घुसून तोडफोड केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन ...
सातारा : येथील अजंठा चाैकातील एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयात घुसून तोडफोड केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय अशोक सावंत, सागर किसन रायते, सुनील चंद्रकांत पवार (रा. माळवाडी, ता. सातारा), शिवराज मोहन टोनपे (रा. शाहूनगर, सातारा) हरिदास शिवाजी पवार (रा. सोनगाव), इम्रान अहमद बागवान (रा. बुधवार पेठ, सातारा), सागर संतोष धोत्रे (रा. करंजे) यांच्यासह इतर पाच ते दहा जणांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.
सातारा तालुक्यातील एका महिलेने फायनान्स कंपनीच्या वसुलीच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या केल्याचा ठपका ठेवून कार्यकर्त्यांनी सोमवार, दि. ७ रोजी फायनान्स कंपनीची तोडफोड केली. या कंपनीचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले. सहायक पोलिस निरीक्षक कांबळे हे अधिक तपास करीत आहेत.