आरक्षण मागणीसाठी साताऱ्यात परीट समाजाने धुतले कपडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 03:26 PM2018-12-17T15:26:40+5:302018-12-17T15:38:38+5:30
परीट समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परीट समाजाने कपडे धुत अनोखे आंदोलन केले.
सातारा : परीट समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परीट समाजाने कपडे धुत अनोखे आंदोलन केले.
अनुसूचित जातीचे आरक्षण मिळावे यासह इतर मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परीट समाज एकत्र आले होते.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परीट समाजाने कपडे धुत अनोखे आंदोलन केले. या आंदोलनात जिल्हाभरातील परीट समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संत गाडगेबाबा यांचा २३ फेब्रुवारी हा जन्मदिवस स्वच्छता दिन म्हणून साजरा करावा, डॉक्टर बांडे समितीचा अहवाल राज्याच्या शिफारशीसह केंद्र सरकारला पाठवावा, संत गाडगेबाबांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, यासह इतर मागण्या परीट समाजाने यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केल्या.