विनाकारण फिरणाऱ्यांकडून नऊ लाखाचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:27 AM2021-07-18T04:27:36+5:302021-07-18T04:27:36+5:30
रामापूर : पाटण शहरात आणि परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनी ४ हजार ६४३ कारवाया केल्या. त्यातील फेब्रुवारीपासून ९ लाख ...
रामापूर : पाटण शहरात आणि परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनी ४ हजार ६४३ कारवाया केल्या. त्यातील फेब्रुवारीपासून ९ लाख ८८ हजार ९ रुपयाचा दंड वसूल केला आहे,’अशी माहिती पाटणचे पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना लोकांकडून, शासनाकडून आणि जिल्ह्याधिकारी यांनी पारित केलेल्या विविध प्रकारचे नियम पाळले जात नव्हते. विविध कारणे सांगून नागरिक फिरत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी तपासणी करून विनाकारण फिरणाऱ्या व नियमांचे भंग करणाऱ्यांवर कारवाई केली जात होती.
फेब्रुवारी २०१९ पासून पाटण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाफोली रोड, झेंडा चौक, मंनदुरे फाटा, सडावाघापूर याबरोबरच तालुक्यातील नवारस्ता, मल्हारपेठ, निसरे फाटा, घेरा दातेगड, मोरगिरी आदी ठिकाणी विनामास्क फिरणे १०८२, विनाकारण फिरणे २५९, सोशल डिस्टन्स न पाळणे १५, मोटार वाहतूक नियमांचा भंग ३१४०, कोरोना नियमांचे उल्लंघन करणे २८, दुचाकी तसेच चारचाकी वाहने जप्त करणे १२९ अशा ४ हजार ६५३ कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यामधून पोलिसांनी सुमारे ९ लाख ८८ हजार ९०० रुपयाचा दंड वसूल केला आहे.