वणवा लावल्याप्रकरणी पाच हजाराचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:37 AM2021-03-19T04:37:36+5:302021-03-19T04:37:36+5:30

चाफळ : चाफळ विभागातील वाघजाईवाडी (डेरवण) येथे फॉरेस्ट कंपाऊंड नंबर ४४२ या क्षेत्रास वणवा लावणाऱ्या एकास वन विभागाने अटक ...

A fine of Rs | वणवा लावल्याप्रकरणी पाच हजाराचा दंड

वणवा लावल्याप्रकरणी पाच हजाराचा दंड

Next

चाफळ : चाफळ विभागातील वाघजाईवाडी (डेरवण) येथे फॉरेस्ट कंपाऊंड नंबर ४४२ या क्षेत्रास वणवा लावणाऱ्या एकास वन विभागाने अटक केली. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी संजय रामचंद्र महिपाल (वय ५५, रा. वाघजाईवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाघजाईवाडी (डेरवण) येथे फॉरेस्ट कंपाऊंड नंबर ४४२ ला लागून खासगी मालकी क्षेत्रात दुपारी वणवा लागल्याने वन कर्मचारी व ग्रामस्थ यांनी जागेवर जाऊन तीन तासाच्या अथक्‌ प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. सदर वणवा हा वाघजाईवाडी येथील संजय महिपाल याने हिराचा माळ शिवारात त्याच्या शेतीचा बांध जाळत असताना लागला. वाऱ्यामुळे आग नियंत्रणात न आल्याने वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वणवा भडकला. महिपाल याच्या निष्काळजीपणामुळे वनक्षेत्रात वणवा गेल्याने त्याला वन विभागाने तात्काळ अटक करीत त्याच्याविरुध्द भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) ब व क अन्वये गुन्हा नोंदविला. त्याला पाटण न्यायालयासमोर हजर केले असता, त्यास न्यायालयाने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. सदरची कारवाई सह वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल विलास काळे, वनपाल एस. बी. भाट, वनरक्षक विलास वाघमारे व वनमजूर यांनी केली.

Web Title: A fine of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.