उदयनराजेंच्या समर्थकांवर अपहरणाचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 02:36 PM2019-04-22T14:36:42+5:302019-04-22T14:37:15+5:30
उमेदवार बिचुकलेंना प्रचार न करण्यासाठी धमकावल्याचा आरोप
Next
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक व जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर यांच्यासह पाचजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात अहपरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. लोकसभेचे उमेदवार अभिजित बिचुकले यांचे गाडीतून अपहरण करून त्यांना प्रचार न करण्यासाठी धमकावल्याच्या आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
अॅड. विकास पवार, पंकज चव्हाण, अॅड. अंकुश जाधव, सुनील काटकर तसेच गाडीवरील ड्रायव्हर (सर्व रा. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत