पांचगणी येथील बिलिमोरीया शाळेस आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 02:02 PM2020-04-21T14:02:27+5:302020-04-21T14:03:07+5:30

पांचगणी येथील शंभर वर्षांपूर्वीच्या जुन्या असलेल्या बिलिमोरिया शाळेस अचानक विजेचा दाब वाढल्याने जनरेटरमध्ये शॉटसर्किट होऊन आग लागली. थोड्याच वेळात आगीने रुद्ररूप धारण केले यामध्ये शाळेतील कॉम्पुटर लॅब व आर्ट रूम, फर्निचर खाक झाली आहे. कोरोना मुळे शाळेला सुट्टी असल्याने जीवित हानी टळली आहे.

Fire at Bilimoria School in Panchgani | पांचगणी येथील बिलिमोरीया शाळेस आग

पांचगणी येथील बिलिमोरीया शाळेस आग

googlenewsNext
ठळक मुद्देपांचगणी येथील बिलिमोरीया शाळेस आगअचानक विजेचा दाब वाढल्याने जनरेटरमध्ये शॉटसर्किट

पांचगणी : पांचगणी येथील शंभर वर्षांपूर्वीच्या जुन्या असलेल्या बिलिमोरिया शाळेस अचानक विजेचा दाब वाढल्याने जनरेटरमध्ये शॉटसर्किट होऊन आग लागली.

थोड्याच वेळात आगीने रुद्ररूप धारण केले यामध्ये शाळेतील कॉम्पुटर लॅब व आर्ट रूम, फर्निचर खाक झाली आहे. कोरोना मुळे शाळेला सुट्टी असल्याने जीवित हानी टळली आहे.

घटनेची माहिती मिळताच पांचगणी नगरपालिका अग्निशमन दल, वाई अग्निशमन दल, महाबळेश्वर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

त्याच बरोबर पांचगणी पाणी पुरवठा करणारे टँकर, एस वो एस टीम, युथ फोरम, पांचगणी नगरपालिकेच्या नगरध्यक्षा, नगरसेवक, पोलीस यंत्रणा, तसेच नगरपालिका कर्मचारी, परीसारतील सामाजिक कार्यकर्ते, एकमेकांच्या सहकार्याने आगीवर नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Fire at Bilimoria School in Panchgani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.