वाठार निंबाळकरमध्ये भीषण आग, कोट्यवधींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 08:55 AM2018-08-31T08:55:40+5:302018-08-31T09:09:22+5:30

फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथील आयुर ट्रेडर्सचे साहित्य ठेवलेल्या जागेत शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

fire broke in factory in Wathar Nimbalkar Villages in Phaltan | वाठार निंबाळकरमध्ये भीषण आग, कोट्यवधींचे नुकसान

वाठार निंबाळकरमध्ये भीषण आग, कोट्यवधींचे नुकसान

फलटण (सातारा) : फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथील आयुर ट्रेडर्सचे साहित्य ठेवलेल्या जागेत शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीत लाकूड, पाचट, बायोमास ब्रिकेट, आठ चारचाकी वाहने जळून खाक झाले. या आगीमध्ये अंदाजे वीस कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले.

फलटण ते पुसेगाव रस्त्यावर वाठार निंबाळकर हद्दीत स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे यांची आयुर ट्रेडर्स ही कंपनी आहे. त्यात बायोमास ब्रिकेटचा उद्योग आहे. 20 एकर जागेत लाकूड, बगैस, प्रेसमड, पाचट, लाकडाचा भुसा, ब्रिकेट आहेत. या जागेतून वीजवाहक तारा गेल्या आहेत. मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास शॉर्टसर्किटने ठिणग्या उडून आग लागली. रात्रभर जास्त वारे असल्याने आग वेगाने पसरली. यावेळी तेथे असणारे कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. नगरपालिकेचा अग्निशमन ही घटनास्थळी आला. मात्र तोपर्यंत आग वेगाने पसरून सर्व जळून खाक झाले. 

या आगीत चार ट्रेक्टर, दोन ट्रक, एक टेम्पो, टँकर जळून खाक झाले. आगीत अंदाजे वीस कोटींचे नुकसान झालेचा अंदाज आहे. घटनास्थळी कृष्णा खोरेचे माजी उपाध्यक्ष रणजिसिंह नाईक- निंबाळकर, वीज वितरण कंपनीचे अधिकारी, महसूल अधिकारी, पोलीस, काँग्रेस कार्यकर्ते यांनी धाव घेतली.

 

Web Title: fire broke in factory in Wathar Nimbalkar Villages in Phaltan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.