महामार्गावर धावत्या ट्रॅक्टरला आग; चालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 01:30 PM2019-01-22T13:30:57+5:302019-01-22T13:34:18+5:30
पुणे-बेंगलोर महामार्गावर वाढे फाटा पुलावर मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास धावत्या ट्रॅक्टरला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात चालक किरकोळ जखमी झाला आहे. सुदाम आप्पा हिरवे (वय २७, रा. माळशिरस, जि. सोलापूर) असे जखमीचे नाव आहे.
सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावर वाढे फाटा पुलावर मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास धावत्या ट्रॅक्टरला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात चालक किरकोळ जखमी झाला आहे. सुदाम आप्पा हिरवे (वय २७, रा. माळशिरस, जि. सोलापूर) असे जखमीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, सुदाम हिरवे याचा ट्रॅक्टर-ट्रॉलीतून ऊस वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्याचे चिंचणेर (ता. सातारा) येथे ऊसतोडणी सुरू आहे. सोमवारी रात्री चिंचणेर येथील शेतकऱ्याचा ऊस सुदाम याने ट्रॅक्टर (एमएच ४५ एफ ८३९४) भुर्इंज येथील किसन वीर कारखान्याला नेला.
मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भुर्इंजहून साताऱ्याच्या दिशेने येत होता. दरम्यान, ट्रॅक्टरमधील बॅटरीला शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. सुदामने ट्रॅक्टर थांबवून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आईलमुळे आगीने पेट घेतला. यात सुदाम जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच सातारा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली.