आग डेपोत अन् धूर घरात; सोनगाव ग्रामस्थांनी अडविल्या घंटागाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 09:14 PM2018-11-11T21:14:03+5:302018-11-11T21:14:43+5:30

शेंद्रे : सोनगाव डेपोतील कचऱ्याला शुक्रवारी रात्री लागलेली आग आटोक्यात न आल्याने सोनगाव, जकातवाडी परिसरात धुराचे लोट पसरले होते. ...

Fire house and smoke in the house; Songaon villagers blocked obstacles | आग डेपोत अन् धूर घरात; सोनगाव ग्रामस्थांनी अडविल्या घंटागाड्या

आग डेपोत अन् धूर घरात; सोनगाव ग्रामस्थांनी अडविल्या घंटागाड्या

Next

शेंद्रे : सोनगाव डेपोतील कचऱ्याला शुक्रवारी रात्री लागलेली आग आटोक्यात न आल्याने सोनगाव, जकातवाडी परिसरात धुराचे लोट पसरले होते. पालिकेकडून याबाबत कोणतीच उपाययोजना न केल्याने संतप्त ग्रामस्थांनी रविवारी सकाळी कचरा डेपोबाहेर घंटागाड्या अडवून ठेवल्या. जोपर्यंत आग विझविली जात नाही व धूर बंद होत नाही, तोपर्यंत डेपोत कचरा टाकू देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता.
गेल्या अनेक वर्षांपासून धुमसत असलेल्या सोनगाव कचरा डेपोतील धुराचा प्रश्न अद्यापही जैसे थे आहे. कचºयाला आग लागली की पालिकेच्या वतीने आगीवर तात्पुरते नियंत्रण आणले जाते; परंतु कालांतराने पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवते. शुक्रवारी सायंकाळी डेपोतील कचºयाने अचानक पेट घेतल्याने सर्वत्र धुराचे लोट परसले होते. शनिवारी दिवसभर व रविवारी सकाळी सोनगाव, जकातवाडी, डबेवाडी या गावांसह सुमारे सात ते आठ किलोमीटर क्षेत्रात धुराचे लोट पसरले होते.

 

Web Title: Fire house and smoke in the house; Songaon villagers blocked obstacles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.