फरसाण बनविणाऱ्या कंपन्यांना आग, दोन कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 06:38 PM2021-07-13T18:38:08+5:302021-07-13T18:40:07+5:30

Fire Koregon Satara : कोरेगाव तालुक्यातील सातारारोड येथील यशवंत सहकारी औद्योगिक वसाहतीतील गणेश फुड्स आणि शाही नमकीन या दोन कंपन्यांना मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास आग लागली. या आगीत दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले. कंपनीतील यंत्रसामुग्री आणि कागदपत्रे जळून खाक झाले. सातारा, रहिमतपूर नगरपालिकांच्या अग्निशामक दलाच्या बंबांबरोबरच स्थानिक ग्रामस्थांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आग आटोक्यात आणली.

Fire, loss of Rs 2 crore to paving companies | फरसाण बनविणाऱ्या कंपन्यांना आग, दोन कोटींचे नुकसान

फरसाण बनविणाऱ्या कंपन्यांना आग, दोन कोटींचे नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देफरसाण बनविणाऱ्या कंपन्यांना आग, दोन कोटींचे नुकसान सातारारोडच्या औद्योगिक वसाहतीत दुर्घटना

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील सातारारोड येथील यशवंत सहकारी औद्योगिक वसाहतीतील गणेश फुड्स आणि शाही नमकीन या दोन कंपन्यांना मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास आग लागली. या आगीत दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले. कंपनीतील यंत्रसामुग्री आणि कागदपत्रे जळून खाक झाले. सातारा, रहिमतपूर नगरपालिकांच्या अग्निशामक दलाच्या बंबांबरोबरच स्थानिक ग्रामस्थांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आग आटोक्यात आणली.

याबाबत माहिती अशी की, सातारा येथे वास्तव्यास असलेल्या नंदकुमार नामदेव कुलकर्णी व विनायक परशुराम गजरे यांनी भागिदारीत गणेश फुड्स ही कंपनी तर वैभव नंदकुमार कुलकर्णी व संकेत विनायक गजरे यांनी भागिदारीत शाही नमकीन ही कंपनी स्थापन केली होती. सातारारोडच्या यशवंत औद्योगिक वसाहतीत प्लॉट नंबर सी ८/९ या १४ गुंठे क्षेत्रात फरसाणा निर्मितीचा कारखाना आहे. सात गुंठ्यांमध्ये कंपनीचे शेड आहे. तेथे विविध खाद्यपदार्थ बनविले जातात. कंपनीच्या मालकांसह चौदाजण तेथे काम करत असून, सकाळी सहा ते सायंकाळी सहा यावेळेत कंपनीचे कामकाज चालते.

नेहमीप्रमाणे सोमवारी कंपनी बंद झाल्यानंतर मालक निघून गेले. तेथेच काही कामगार वास्तव्यास आहेत. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास अचानक कंपनीला आग लागली. आगीचे आणि धुराचे लोट पाहून कामगार रामरतन कुशवाह याने नंदकुमार कुलकर्णी यांना मोबाईलवरुन फोन करुन आगीची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षास आगीची माहिती दिली.

सातारारोडचे ग्रामस्थ, युवक, औद्योगिक वसाहतीतील इतर कारखानदार, सहायक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांच्यासह पोलीस कर्मचारी, सातारा व रहिमतपूर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सातारारोडच्या वालचंदनगर इंडस्ट्रीजच्या अग्निशमन यंत्रणेचा वापर करण्यात आला. पाच तासांच्या अविरत परिश्रमानंतर आग आटोक्यात आली.

यंत्रणा खाक

या आगीमध्ये कंपनीतील फरसाणा फ्रायर मशीन, आटा मशीन, हायड्रो मशीन, बुंदी, शेव व वेफर्स बनविणारे मशीन्स, संगणक, सीसीटीव्ही संच, कार्यालयीन कागदपत्रे असे २ कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची फिर्याद नंदकुमार कुलकर्णी यांनी दिली असून, कोरेगाव पोलीस ठाण्यात जळिताची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे तपास करत आहेत.
 

Web Title: Fire, loss of Rs 2 crore to paving companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.