कास मार्गावरील वृक्ष बहरण्यापूर्वीच आगीत होरपळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:39 AM2021-04-08T04:39:18+5:302021-04-08T04:39:18+5:30

पेट्री : सातारा : कास मार्गावर दोन वर्षांपूर्वी हायब्रीड ॲन्युटी योजनेंतर्गत रुंदीकरणाला सुरुवात झाली अन् पहिली कुऱ्हाड पडली ती ...

The fire started before the tree on Kas Marg blossomed | कास मार्गावरील वृक्ष बहरण्यापूर्वीच आगीत होरपळले

कास मार्गावरील वृक्ष बहरण्यापूर्वीच आगीत होरपळले

Next

पेट्री :

सातारा : कास मार्गावर दोन वर्षांपूर्वी हायब्रीड ॲन्युटी योजनेंतर्गत रुंदीकरणाला सुरुवात झाली अन् पहिली कुऱ्हाड पडली ती रस्त्याच्या कडेला असणाऱ्या वृक्षांवर. दरम्यान या मार्गावर रस्ता झालेल्या काही ठिकाणी मागील वर्षी जून महिन्यात वृक्षलागवडीचे काम हाती घेऊन वर्षभर वृक्षांचे संगोपन होत होते. परंतु या परिसरात गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून वारंवार लागलेल्या वणव्याने यापैकी बहुतांशी वृक्ष बहरण्यापूर्वीच जळून गेली.

गतवर्षी गणेशखिंड ते देवकल फाटा यादरम्यान रस्त्याचे काम पूर्णत्वास आल्याने काही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा आंबा, फणस, वड, पिंपळ यासह वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात आली होती. काही झाडे आगीची धग लागून सुकून गेली. विघ्नसंतुष्टांच्या अविवेकी कृत्यांबाबत पर्यावरणप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे.

जागतिक वारसास्थळ कासपठार, कास तलाव, देशातील सर्वाधिक उंचीचा वजराई धबधबा, बामणोलीचा नौकाविहार या प्रमुख पर्यटनस्थळांचे सौंदर्य वाढविणारी हिरवीगार दाट झाडी तसेच निसर्गसौंदर्य अबाधित ठेवणारी या मार्गावरील वनसंपदा विकासकामांमुळे धोक्यात येत असताना या मार्गावर वृक्षारोपण कधी होणार याची पर्यावरणप्रेमींना उत्सुकता लागली होती. तोडण्यात आलेल्या झाडाच्या मोबदल्यात नवीन झाडे लावून त्याचे संगोपन करणे क्रमप्राप्त असल्याने ठेकेदाराकडून तसे नियोजन करण्यात आले होते. दरम्यान या मार्गावर ज्या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले, अशा गणेशखिंड रस्त्यालगत गतवर्षी फणस, आंबा, जांभूळ, कंरज, सावर, उंबर, बदाम, पिंपळ, सोनआपटा, नीलगिरी या एकूण पंधरा प्रकारच्या विविध जातींच्या वृक्षारोपणास सुरुवात होऊन हा मार्ग पुन्हा हिरव्यागार वनराईने बहरत असताना या परिसराला विघ्नसंतुष्टांची नजर लागली अन् कित्येक वृक्ष बहरण्यापुर्वीच आगीत होरपळली.

चौकट

रस्त्याचे काम, विजेचे खांब रोवून तार ओढण्याचे काम अशा अनेक प्रकारची कोणतीही कामे करायची म्हटले की, प्रथम गडांतर येते ते झाडांवर !झाडांचा कधीही अडथळा होत नाही तर झाडेच पर्यावरण असंतुलनातील अनेकविध अडथळे बाजूला करतात. कायम निःस्वार्थपणे मनुष्याला फळे, फुले, सावली देतात.

कोट

देशी झाडांची लागवड पर्यावरणपूरक असून, विदेशी झाडे ही पर्यावरणास मारक असतात. या परिसरातील कित्येक देशी झाडे ही वणव्यात भक्ष्य झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळू लागला आहे.

-हेमंत शिंदे, पर्यावरणप्रेमी

०७पेट्री

कास रस्त्यावर गणेशखिंड परिसरात गतवर्षी जूनमध्ये लागवड करण्यात आलेली वृक्ष बहरण्यापूर्वीच आगीत होरपळत आहेत.

Web Title: The fire started before the tree on Kas Marg blossomed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.