सातारा जिल्ह्यातील पहिले हरभरा केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:07 PM2018-04-20T23:07:10+5:302018-04-20T23:07:10+5:30
पिंपोडे बुद्रुक : सध्याचा बाजारभाव लक्षात घेता शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्याच्या हेतूने त्यांना किमान किफायतशीर भाव मिळावा,
पिंपोडे बुद्रुक : सध्याचा बाजारभाव लक्षात घेता शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्याच्या हेतूने त्यांना किमान किफायतशीर भाव मिळावा, या हेतूने कोरेगावातील मुख्य बाजारात सातारा जिल्ह्यातील पहिले हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचा जास्तीतजास्त शेतकºयांनी लाभ घेण्याचे आवाहन खरेदी-विक्री संघाच्या वतीने चेअरमन शहाजी भोईटे यांनी केले आहे.
शेतकºयाच्या मालाला केंद्र शासनाने निर्धारित केलेली किमान आधारभूत किंमत मिळावी, या हेतूने कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ, शेती उत्पन्न बाजार समिती व मार्केटिंग फेडरेशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने रब्बी हंगाम २०१७-१८ करिता बाजार समिती कोरेगाव येथील मुख्य बाजार आवारात जिल्ह्यातील पहिले हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून, नुकतेच त्याचे उद्घाटन सहकारी संस्था सहायक निबंधक संजय सुद्रिक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शहाजी भोईटे, बाजार समीतीचे सभापती प्रतापराव कुमुकले, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे देसाई तसेच बाजार समिती खरेदी-विक्री संघाचे व्हाईस चेअरमन, सर्व संचालक पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाचे कृषी सहकार व पणन विभागामार्फ त रब्बी हंगामामध्ये जास्तीत जास्त हरभरा उत्पन्न अपेक्षित होते, त्यामुळे ज्यादा आवक ज्याल्याने बाजार भाव किमान अधारभूत किमतीपेक्षा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती, अशाप्रकारे शेतकºयांची गळचेपी होऊन आर्थिक नुकसान होऊ नये, या हेतूने खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.
या ठिकाणी केंद्र शासनाने ठरविलेल्या किमान आधारभूत किमतीने म्हणजेच प्रतिक्विंटल ४४०० रुपये दराने हरभरा खरेदी करण्यात येणार आहेत.
यासाठी शेतकºयांनी खरेदी केंद्रावर आॅनलाईन नोंदणी करता हरभरा या पीक पाण्याच्या नोंदीसह सातबारा उतारा, आधारकार्ड, बँक पासबुकची प्रत घेऊन येणे अनिवार्य केले आहे.
दरम्यान, शेतकºयांनी खरेदी केंद्र्रावर आणलेला माल स्वच्छ असावा, मालाची आर्द्र्रता कमाल १४ टक्के असावी, तो कडीकचरा किंवा मातीमिश्रित नसावा, असे अवाहन खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक राजेंद्र येवले यांनी केले आहे.
सोयाबीन विक्रीला प्रतिसाद
यापूर्वी देखील खरेदी-विक्री संघाच्या वतीने खरीप हंगामात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करून ६१८२ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले होते.
एकीकडे वाढत्या भांडवली खर्चाच्या तुलनेत बाजारभावामध्ये होणारी दराची घसरण लक्षात घेता शेतकºयांना आपल्या मालाला किफायतशीर बाजारभाव मिळण्याच्या हेतूने खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून, जास्तीत जास्त शेतकºयांनी त्याचा फायदा घ्यावा.
- शहाजी भोईटे, चेअरमन,
कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघ