सातारा जिल्ह्यात पहिला शंभर फुटी ध्वज ही अभिमानाची बाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 11:31 AM2021-11-18T11:31:35+5:302021-11-18T11:32:58+5:30
कोयनानगर : सातारा जिल्ह्यात पहिला शंभर फुटी ध्वज उभारण्यात आला आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. तसेच महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा ...
कोयनानगर : सातारा जिल्ह्यात पहिला शंभर फुटी ध्वज उभारण्यात आला आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. तसेच महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा असताना रक्तदात्यांनी पुढे येऊन महारक्तदान शिबिर घेतले. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रेमाखातर १ हजार १११ जणांनी रक्तदान केले, ही बाबदेखील आदर्श निर्माण करणारी आहे, असे मत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
दौलतनगर, ता. पाटण येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्र दौलतनगर येथे लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारक येथे उभारण्यात आलेल्या स्तंभ व ध्वजाचे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर (मरळी) येथे उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभ आणि ध्वजाचे लोकार्पण नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मंत्री शंभूराज देसाई , मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई, देसाई कुटुंबीय, कोल्हापूर परिक्षेत्राचे महा निरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे, डिके प्लॅग फाउंडेशनचे राकेश बक्षी यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये कोविड मुकाबला करीत असताना जिवाची बाजी लावून प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून ज्यांनी काम केले त्या कोविड योद्ध्यांचा याठिकाणी सत्कार होत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे.
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, विधानसभेतील गटनेते एकनाथ शिंदे यांनी प्रतिकूल हवामान असताना ते पाटण विधानसभा मतदारसंघात प्रेमापोटी आले आहेत. माझा वाढदिवस असला तरी आज १ हजार १११ लोक रक्तदान करणार आहेत. येथे भव्य रक्तदान शिबिर पार पडणार आहे. जिल्ह्यातील पहिला १०० फुटी राष्ट्रध्वज उभारला जात आहे. यावेळी मंत्री देसाई म्हणाले, शंभर फुटी ध्वजाचे लोकार्पण करण्यात येत असून, त्याच वेळी १ हजार १११ रक्तदात्यांनी रक्तदानाचा संकल्प सोडून आरोग्य विभागाला मोठा हातभार लावला आहे.
यावेळी प्राथमिक स्वरूपात रक्तदान करणाऱ्या दात्यांचा तसेच कोरोना संसर्गाच्या काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या कोरोना योद्ध्दांचा सत्कार नगरविकास मंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. सातारा जिल्ह्यात पहिला १०० फूट ध्वज उभारण्यात आला असून, ही अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्रात आज रक्ताचा तुटवडा असून, रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे. या महारक्तदान शिबिरामध्ये १ हजार १११ लोक रक्तदान करणार असून, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी लोकाभिमुख काम करून आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन मंत्री शिंदे यांनी केले.
याप्रसंगी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, डिके फ्लेग फौंडेशनचे डॉ. राकेश बक्षी, यशराज देसाई यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
दोन बाळासाहेबांचे स्मरण...
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे नातू गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई राज्याची उत्कृष्ट जबाबदारी पार पाडत आहेत. महारक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून या माध्यमातून समाजाला अपेक्षित असणारे काम करून त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा पुण्यस्मरणाचे औचित्य साधून विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.