‘माझी वसुंधरा ४.०’मध्ये मान्याचीवाडी राज्यात प्रथम, एक कोटीचे बक्षीस 

By नितीन काळेल | Published: September 27, 2024 11:20 PM2024-09-27T23:20:43+5:302024-09-27T23:20:55+5:30

राज्यातील २२ हजार २१८ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता.

First in the state of Manyachiwadi in 'Mazhi Vasundhara 4.0', one crore prize  | ‘माझी वसुंधरा ४.०’मध्ये मान्याचीवाडी राज्यात प्रथम, एक कोटीचे बक्षीस 

‘माझी वसुंधरा ४.०’मध्ये मान्याचीवाडी राज्यात प्रथम, एक कोटीचे बक्षीस 

सातारा : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने माझी वसुंधरा अभियान ४.० चा निकाल जाहीर केला असून, दीड हजारपेक्षा कमी लोकसंख्या गटात पाटण तालुक्यातील मान्याचीवाडीने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. यामुळे गावाला एक कोटीचे बक्षीस मिळाले आहे, तर या पुरस्कारामुळे सातारा जिल्ह्याचा डंका पुन्हा वाजला आहे.

पृश्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित ‘माझी वसुंधरा अभियान राज्यात २०२० पासून राबविण्यास सुरूवात झाली, तर माझी वसुंधरा अभियान ४.० हे राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांत १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ पर्यंत राबविण्यात आले. यात राज्यातील २२ हजार २१८ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेचा निकाल लागला आहे. यामध्ये मान्याचीवाडी गावाने दीड हजारपेक्षा कमी लोकसंख्या गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळवत एक कोटीचे बक्षीस प्राप्त केले आहे, तर या गटातच दुसरा क्रमांक नाशिक जिल्ह्यातील आवळी दुमाला, तर तिसरा क्रमांक अहमदनगर जिल्ह्यातील तिगाव गावाने प्राप्त केला आहे.

सातारा पालिकेला आठ कोटी...
या अभियानात, तसेच भूमी थिमॅटिक उपक्रमात सातारा नगरपालिकेने राज्यात पहिला क्रमांक मिळवला. याबद्दल पालिकेस आठ कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. यामुळे सातारा शहरवासीयांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मान्याचीवाडी गावाने माझी वसुंधरा अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या गावाने आतापर्यंत अनेक अभियान, उपक्रमांत यश मिळवून सातारा जिल्ह्याचे नाव राज्य, देशात नेहमीच उंचावले आहे. मान्याचीवाडी गावाचे अभिनंदन, तसेच जिल्ह्यातील इतर गावांनीही अभियानांमध्ये सहभाग घेऊन यश मिळवावे.
- याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी

Web Title: First in the state of Manyachiwadi in 'Mazhi Vasundhara 4.0', one crore prize 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.