कला उत्सवात सातारा जिल्ह्याचा डंका

By प्रगती पाटील | Published: December 6, 2023 01:50 PM2023-12-06T13:50:35+5:302023-12-06T13:50:48+5:30

सातारा : सातारा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण, जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्यमिक) व सातारा कलाध्यापक संघ सातारा ...

First rank of Satara district in art festival | कला उत्सवात सातारा जिल्ह्याचा डंका

कला उत्सवात सातारा जिल्ह्याचा डंका

सातारा : सातारा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण, जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्यमिक) व सातारा कलाध्यापक संघ सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कला उत्सवाचे नियोजन करण्यात आलेले होते. यामध्ये सातारा जिल्ह्यातील विविध शाखांच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करत जिल्ह्याच्या नावाचा डंका वाजवला.

उत्सवात पारंपारिक लोकसंगीत गायनमध्ये कऱ्हाडची आर्या जाधव, पाटणचा प्रतिक गुजर, स्वरवाद्य वादनात साताऱ्याची स्वरा किरपेकर, तालवाद्यवादनात साताऱ्याची मृण्मयी भूते, चैतन्य पटवर्धन, नाट्य भूमिका अभिनयमध्ये प्रज्ञा कुंभार, सुमंत कचरे, शास्त्रीय नृत्यमध्ये शिरवळची अदिती कुंभार, पारंपारिक लोकनृत्यमध्ये देगावची सिया घाडगे, साताऱ्याचा आयुष खुळे, द्विमित चित्रमध्ये फलटणची प्रेरणा घनवट, साताऱ्याचा अवधूत देशमाने, त्रिमित चित्र शिल्पमध्ये महाबळेश्वरची रिया कांबळे, पाटखळचा उदय लोहार, खेळणी तयार करणेमध्ये वाइच्या उत्कर्ष शाम नवले यांनी यश संपादन केले.

या सर्व विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कला उत्सवात प्रथम क्रमांक मिळवला आहे. पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय कला उत्सवामध्ये खालील विद्यार्थ्यांची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कला उत्सवासाठी निवड झालेली आहे. यात त्रिमित शिल्प उदय लोहार, द्विमितीयचित्र प्रेरणा घनवट, लोकनृत्य- आयुष्य खुळे, ताल वाद्यांमध्ये मृण्मयी भुते, चैतन्य पटवर्धन या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांचा सत्कार अनंत इंग्लिश स्कूल,सातारा येथे झाला. यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटणचे प्राचार्य.डॉ.रामचंद्र कोरडे व शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, चेतना माजगावकर, सुनील झंवर, प्राचार्य श्रीमंत गायकवाड, र्पवेक्षक अजीज शेख तसेच सातारा जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष उमेश देशमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन अंकुश कुंभार व अविनाश आगलावे यांनी केले. या कला उत्सवासाठी जिल्यातील अनेक कला व संगीत शिक्षकांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी कलाशिक्षक सागर सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: First rank of Satara district in art festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.