रहिमतपूर सोसायटीत प्रथमच शिवसेनेची शिट्टी

By admin | Published: February 13, 2015 10:03 PM2015-02-13T22:03:19+5:302015-02-13T22:57:47+5:30

तिहेरी लढत : सेनेच्या एंट्रीने निवडणूक रंगणार र

For the first time, Shiv Sena's Shitali in Rahimatpur Society | रहिमतपूर सोसायटीत प्रथमच शिवसेनेची शिट्टी

रहिमतपूर सोसायटीत प्रथमच शिवसेनेची शिट्टी

Next

हिमतपूर : कोरेगाव तालुक्यात राजकीयदृष्ट्या जागृत समजल्या जाणाऱ्या रहिमतपूर विकास सेवा सोसायटी निवडणुकीमध्ये शिवसेना व इतर समविचारी पक्षांनी पहिल्यांदाच ‘शिट्टी’ चिन्ह निश्चत करून राजकीय आखाड्यात उडी मारल्याने निवडणुकीत राष्ट्रवादी की राष्ट्रीय काँग्रेस शिट्टी वाजणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. २७१५ सभासद असलेल्या विकास सेवा सोसायटीवर सध्या राष्ट्रीय काँग्रेसच्या चित्रलेखा माने-कदम, माजी नगराध्यक्ष संपत माने यांचे वर्चस्व आहे. व दुसरा विरोधी गट राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांचा आहे. या दोघांमध्ये खरी लढत रंगणार असल्याचे चित्र असले तरी शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांचे वास्तव्य शहरात असल्यामुळे किरण भोसले, अमर माने यांच्या साथीने या दोन्ही पक्षापुढे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे अर्ज भरल्यानंतर तिरंगी निवडणूक होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ऐन निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसप्रणित आघाडीने नुकताच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा ठराव चित्रलेखा माने-कदम यांच्या नावाने केल्याने त्या गंभीरपणाने निवडणुकीकडे पाहू लागल्या आहेत. बैठका होऊ लागल्या आहेत, तर सुनील माने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असल्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीने या निवडणुकीला महत्त्व आले आहे. त्यांनीही आता नाही तर पुन्हा नाही, असा चंग बांधून कार्यकर्ते चार्ज केले आहेत. नितीन बानुगडे-पाटलांची सुद्धा पहिलीच निवडणूक म्हणून ते व्यूहरचना करून प्रक्रिया पार पाडत आहेत. शहरातील प्रमुख राजकीय पक्षाच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केल्याचे अर्ज भरण्याच्या दिवशीचे चित्र होते; परंतु नेत्यांनी या तडजोडीला हिरवा कंदील दाखवला नाही. परंतु त्यासाठी कार्यकर्ते धडपडताना दिसत आहेत. पूर्वी माझी नगराध्यक्ष वासुदेव माने हे सोसायटी निवडणुकीचे केंद्रबिंदू राहिले होते. नुकतेच त्यांनी पालकमंत्री विजय शिवतारे यांचे शहरात स्वागत केले होते. त्यांनी त्यांची या निवडणुकीतील भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे. त्यांच्या भूमिकेकडे शहरातील लोकांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यांच्या भूमिकेचा निवडणूक निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशी लोकांच्यात चर्चा रंगू लागली आहे. (वार्ताहर) दहा वर्षांत आम्ही सत्तेच्या माध्यमातून आमच्या संचालक मंडळाच्या ऐकोप्याने साठ वर्षांची अडचण म्हणजे सर्व सोयीनियुक्त अद्ययावत इमारत उभी केली आहे. व सोसायटी कर्जमुक्त सुद्धा केली आहे अभ्यासू संचालक मंडळ असल्यामुळे इतरांनी आदर्श घ्यावा, असे कामकाज चालू आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण सक्षमपणे निवडणुकीस सामोरे जात आहोत. - चित्रलेखा माने-कदम, काँग्रेस गेली दहा वर्षे विकास सेवा सोसायटीची सत्ता राष्ट्रीय काँग्रेसकडे असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी एकही योजना राबविली गेली नाही. तसेच सोसायटीच्या सचिवाने जो अपहार केला होता, त्याबाबत कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने संस्थेचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहेत. - सुनील माने, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: For the first time, Shiv Sena's Shitali in Rahimatpur Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.