पहिल्यांदाच आले गढूळ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:41 AM2021-07-30T04:41:10+5:302021-07-30T04:41:10+5:30

आपत्ती व्यवस्थापनाचा गृहपाठच नाही! जिल्हाधिकारी कार्यालयात अस्तित्वात असलेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने यापूर्वीही आणि आत्ताही आपला गृहपाठच केला नसल्याचे समोर ...

For the first time there was muddy water | पहिल्यांदाच आले गढूळ पाणी

पहिल्यांदाच आले गढूळ पाणी

Next

आपत्ती व्यवस्थापनाचा गृहपाठच नाही!

जिल्हाधिकारी कार्यालयात अस्तित्वात असलेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने यापूर्वीही आणि आत्ताही आपला गृहपाठच केला नसल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन पावसांचा अनुभव, जिल्ह्यातील डोंगर उतारावरील गावे यांसह तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून प्रतिबंधात्मक उपाय करण्याचा विचारच या विभागाकडून होत नाही. आपत्ती आल्यावर धावधाव करण्यापेक्षा ती येऊ नये, यासाठी आवश्यक तयारी आणि खबरदारी घेण्याचीही सवड या विभागाला नाही, हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

दरडप्रवण क्षेत्रात या गावांचा उल्लेख नाही

देवरूखकरवाडी (कोंडावळ) वीस घरांवर दरड कोसळली. त्यातील ७ घरे पूर्णपणे ढिगाऱ्याखाली गेली. घराबरोबरच त्यात अडकलेल्या ३० लोकांना रात्रीत सुरक्षित स्थळी हलवून मोलाची कामगिरी केली. गेल्या काही वर्षांत पर्जन्यमान वाढल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे डोंगरउतारावरील या गावांमध्ये पावसाळ्यात काहीही होऊ शकतं, याचा विचारच कोणत्याही पातळीवर झाला नसल्याचे दिसते. देवरूखकरवाडीचा नामोल्लेखही दरड प्रवण क्षेत्रात नसल्याचे आता समोर आले आहे.

सजग नेत्याला तत्पर प्रशासनाची साथ

खंडाळा-वाई मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील यांना या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने यंत्रणा हलवली. आमदार म्हणून असलेल्या सर्व अधिकारांचा वापर करून त्यांनी स्वत: आपल्या कार्यकर्त्यांसह महसूल, आरोग्य विभागालाही हाताशी घेतलं. साडे सात वाजता दरड कोसळल्यानंतर अवघ्या तासाभरात ते घटनास्थळावर पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत जेसीबी, पोकलेन यांसह आवश्यक साधनसामग्रीही होती. सजग नेत्याला प्रशासनाची साथ लाभल्याने अवघ्या तासाभरात मदतकार्य सुरू झाले. त्यामुळे देवरूखकरवाडीचे आंबेघर होण्याचं टळलं. यंत्रणेला मदत उभी करण्यास आणखी थोडा विलंब झाला असता तरी दुर्दैवाने देवरूखकरवाडीतील मृतांचा आकडा वाढला असता.

सोशल शायनिंग ठरतंय त्रासदायक

पूरपरिस्थिती समोर असतानाही वोट बँकेच्या नादी लागून सवंग प्रसिद्धी मिळविणाऱ्या गाव पुढाऱ्यांचा यंत्रणेला प्रचंड त्रास सहन करावा लागला. आम्ही सांगितलं म्हणून 'एनडीआरएफ'ची फौज इकडे आली, असे धाडसी दावेही या चमूने केले. कामात आणि मदत पुरविण्यात व्यस्त असलेल्या प्रशासनाला जाब विचारणं, पूरबाधितांना भडकवणं आणि शासकीय मदत देण्यास अडथळे उभे करण्याचाही प्रयत्न या आपत्तीकाळात झाला; पण या सर्वांना पुरून उरल्या त्या वाईच्या उपविभागीय अधिकारी संगीता राजपूरकर. कामांच्या मध्ये येणाऱ्या प्रत्येकाला जागेवर समज देऊन त्यांनी आमचं प्राधान्य आपत्तीग्रस्तांना सुरक्षित ठेवणं असल्याचं सांगून पुन्हा काही आगाऊपणा कराल तर गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड दमही दिला. त्यांच्या या भूमिकेचे समर्थन लोकप्रतिनिधींनीही केले.

पांईंटर :

वाई तालुक्यातील बाधित गावे

कोंढावळे, देवरूखकरवाडी, ज्ञानेश्वरवाडी, गणेशवाडी, कोंढवली खुर्द, जोर, गोळेगाव, नांदगणे, जांभळी, पिराचीवाडी, अभेपुरी, वळूंब, म्हलतपूर, वेलंग, धावडी, जांब, किकली, दरवाडी, पाचवड, मेंगवली, वरखडवाडी.

बाधित गावे : ४४

मृत्यू : ३

बेपत्ता : २

पशू मृत्यू : २८

शेती नुकसान : ५९० हेक्टर

रस्ते : २५० किलोमिटर

शैक्षणिक नुकसान : १६ इमारती

स्थलांतरित कुटुंब : ६९

दरडप्रवण गावे : ८

महसुली नुकसान : २३ कोटी ४४ लाख

Web Title: For the first time there was muddy water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.