लसीकरण पूर्ण करणारे पळशी जिल्ह्यातील पहिला गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:35 AM2021-04-14T04:35:59+5:302021-04-14T04:35:59+5:30
लोहम खंडाळा तालुक्यातील पळशी गावात ४५ ते ६० वयोगटातील लोकांचे पूर्ण लसीकरण झाले. सदर गाव लसीकरण पूर्ण होणारे पाहिले ...
लोहम
खंडाळा तालुक्यातील पळशी गावात ४५ ते ६० वयोगटातील लोकांचे पूर्ण लसीकरण झाले. सदर गाव लसीकरण पूर्ण होणारे पाहिले गाव आहे. असे वक्तव्य जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील केले.ते म्हणाले, गावात जनजागृती करण्यात आली. सध्याच्या काळात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता. लसीकरणाचे महत्त्व लोकांना घरोघरी जाऊन पटवून दिले. लस घ्यायला येताना पोटभर जेवण करून येणे तसेच एक दिवस आराम घेणे अशा सूचना देण्यात आल्या. त्यामुळे लोकांना त्रास झाला नाही.
प्रथम कोविडचे सर्व नियम पाळून ग्रामपंचायत मध्ये नोंदणी करून मगच नोंद झालेल्या व्यक्तीना आरोग्य केंद्रात कोवीशिल्ड लस घेण्यासाठी पाठवले जात होते. यासाठी सरपंच हेमा गायकवाड, उपसरपंच एकनाथ भरगुडे, डॉ.मनीषा ठाकूर, नसिरा पटेल, सीमा बरगे आरोग्य सेविका, शोभा मोरे, सोनाली राऊत, प्रीती राऊत अशा स्वयंसेविका आपत्ती व्यवस्थापन समिती आदींनी आपले सहकार्य केले.