अत्याचार करून युवतीचा पाचवेळा गर्भपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:26 AM2021-06-10T04:26:38+5:302021-06-10T04:26:38+5:30
सातारा : मूळच्या जावली तालुक्यातील युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी बाबूराम डोलाराम चौधरी (सध्या रा. राधिका ...
सातारा : मूळच्या जावली तालुक्यातील युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी बाबूराम डोलाराम चौधरी (सध्या रा. राधिका टॉकीज चौक, सातारा, मूळ रा. राजस्थान) याच्याविरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, युवकाच्या कुटुंबीयांनीही युवतीला वेळोवेळी धमकावून जातीवाचक शिवीगाळ केल्याने त्यांच्याविरुध्दही गुन्हा दाखल झाला आहे.
बाबूलाल चौधरी, पानीदेवी चौधरी, डोलाराम चौधरी, मोहनलाल चौधरी, भवरीदेवी चौधरी, ओमाराम चौधरी, अशोक चौधरी, मुकेश चौधरी, दिनेश चौधरी (सर्व रा. राजस्थान) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, तक्रारदार युवती सध्या सातारा शहर परिसरात वास्तव्य करत आहे. २०१८मध्ये तिची संशयित युवक बाबूलालसोबत ओळख झाली. संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. यातून ती युवती पाचवेळा गरोदर राहिली. मात्र, युवतीची इच्छा नसताना संशयिताने कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला. युवतीने लग्नाचा तगादा लावल्यानंतर मात्र संशयित पसार झाला.
युवतीने संशयिताला वेळोवेळी फोन केला. मात्र, त्याने फोन उचलला नाही तसेच नंतर फोन बंद केला. यामुळे युवतीने राजस्थान गाठले. तेथे गेल्यानंतर तिथे तिला युवकाच्या कुटुंबीयांनी अपमानास्पद वागणूक देऊन जातीवाचक शिवीगाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे समोर आल्याने अखेर युवतीने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.