संचारबंदीप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:37 AM2021-03-28T04:37:40+5:302021-03-28T04:37:40+5:30

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ याठिकाणी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी रात्रीच्या सुमारास जारी केलेल्या संचारबंदीच्या आदेशाचा ...

Five charged in curfew | संचारबंदीप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

संचारबंदीप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

Next

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ याठिकाणी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी रात्रीच्या सुमारास जारी केलेल्या संचारबंदीच्या आदेशाचा भंग करीत विनाकारण फिरत असताना आढळून आल्याने ५ जणांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी रात्रीच्या सुमारास जिल्ह्यामध्ये संचारबंदीचा आदेश लागू केलेला आहे.

त्यानुसार शिरवळ याठिकाणी शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश वळवी, पोलीस हवालदार संतोष मठपती, नवनाथ कोळेकर हे रात्रगस्त करीत असताना शिरवळ हद्दीमधील एका हॉटेललगत विनाकारण फिरत असताना किरण पद्माकर देशपांडे (वय ५३) व मोशीन शौकत बागवान (३५), तसेच शिरवळ येथील मोठ्या बोगद्यालगत मोफीज रज्जाक शेख (२२) व महामार्गालगत एका हॉटेललगत योगेश जयकर साळुंखे (२७) व अक्षय अशोक गायकवाड (२१, सर्व रा. शिरवळ) यांनी विनाकारण फिरत संचारबंदीच्या आदेशाचा भंग केल्याचे निदर्शनास आले.

याप्रकरणी पोलीस हवालदार संतोष मठपती, नवनाथ कोळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची शिरवळ पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश वाळवी तपास करीत आहेत.

Web Title: Five charged in curfew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.