कोपर्डेत आजपासून पाच दिवस जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:42 AM2021-04-28T04:42:55+5:302021-04-28T04:42:55+5:30
या बैठकीसाठी सरपंच नेताजी चव्हाण, कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय चव्हाण, अमित पाटील, ग्रामविकास अधिकारी ...
या बैठकीसाठी सरपंच नेताजी चव्हाण, कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय चव्हाण, अमित पाटील, ग्रामविकास अधिकारी शिवाजी लाटे, सामाजिक कार्यकर्ते संभाजी चव्हाण, आबासाहेब चव्हाण, शिवाजी चव्हाण, लालासाहेब चव्हाण, एम. बी. चव्हाण, डॉ. एम. आय. मुल्ला आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
कोपर्डे हवेली हे जिल्हा परिषद गटातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले गाव आहे. गत पंधरा दिवसांपासून दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये बैठक होऊन पाच दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये दूध डेअरींना फक्त एका तासाची वेळ देण्यात आली आहे. तसेच मेडिकल वगळता गावातील भाजीपाला, दुकाने, इतर व्यवसाय बंद राहणार आहेत. यातून एखाद्याने नियमाचा भंग केल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. शिवाय गावातून विनामास्क फिरू नये, असे निर्णय घेतले असून रविवारपर्यंत हा जनता कर्फ्यू लागू राहणार आहे.