पाचशे पोलीस वारीत; तरीही सातारा तयारीत- संयम जिंकला : अपुऱ्या बळावरही साताºयात ‘स्मार्ट पोलिसिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 10:53 PM2018-07-26T22:53:28+5:302018-07-26T22:57:04+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समन्वय समितीच्या वतीने जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून ठिकठिकाणी बंद, मोर्चा सुरू आहे त्यात मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी पंढरपूर बंदोबस्तात अडकले असताना बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात झालेला हिंसाचार संयमाने हाताळला.
स्वप्निल शिंदे ।
सातारा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समन्वय समितीच्या वतीने जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून ठिकठिकाणी बंद, मोर्चा सुरू आहे. त्यात मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी पंढरपूर बंदोबस्तात अडकले असताना बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात झालेला हिंसाचार संयमाने हाताळला. तसेच त्याचे लोण इतरत्र पसरले नाही. त्यामुळे कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सातारा जिल्हा पोलिसांचे कौतुक केले आहे.
दूध आंदोलन आणि पंढरपूर वारीसाठी शासनाने मोठा बंदोबस्त ठेवला होता. सातारा पोलीस दलात सध्या २ हजार ९०० कर्मचारी करतात. त्यापैकी ५०० कर्मचारी सध्या पंढरपूर वारीच्या बंदोबस्तात आहेत. ते अजूनही साताºयात आले नव्हते. त्यात मंगळवारपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी बंद पुकारण्यात आला होता. बुधवारी महाबळेश्वर, पाचगणी, शिरवळ, खंडाळा, कºहाड आदी ठिकाणी मोर्चा आणि बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे त्या त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्ताला होते. साताºयात अवघ्या ३०० कर्मचाºयांचा फौजफाटा होता. तर मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होेते.
शेकडोच्या संख्येत असलेल्या पोलिसांना हजारोंच्या संख्येने सहभागी झालेले आक्रमक आंदोलनकर्त्यांवर नियंत्रण ठेवणे अशक्य होते. मात्र, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने, पोलीस निरीक्षक पद्माकर घटवट, नारायण सारंगकर यांनी रणनिती आखून तणावजन्य परिस्थिती संयमाने हाताळली. पोलीस अधिकारी व कर्मचाºयांसह ५ स्टाईकिंग फोर्सच्या मदतीने महामार्ग परिसरात कॉम्बिंग आॅपरेशन करून दगडफेक करणाºया ८५ जणांना ताब्यात घेतले. त्यामुळे अवघ्या २ तासांत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर तणाव निवळून परिस्थिती पूर्ववत झाली.
पवार, राजमानेंच्या रणनितीने नुकसान टळले
मराठा क्रांती समन्वय समितीचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आला असता महामार्गावर हिंसक कारवाई होण्याची शक्यता असलेल्या अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार व उपअधीक्षक गजानन राजमाने यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ एक पथक महामार्गावर रवाना केले.
जमावाने महामार्ग रोखल्यानंतर पोलिसांनी अजंठा चौक ते वाढेफाटा, कृष्णानगर ते जिल्हा परिषद परिसरात रस्त्यावर एकही खासगी वाहन राहणार नाही, याची दक्षता घेतली. त्यामुळे जमावाने दगडफेक केली, त्यात पोलिसांच्या वाहनांचे नुकसान झाले. बाकीचे कोणतेच वाहन नसल्यामुळे मोठे नुकसान टळले.