तीव्र उतारावर टेम्पोचा ब्रेक फेल; अपघातात पाच जण जखमी, कास-अंधारी घनदाट जंगलात घडली दुर्घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 02:32 PM2021-12-23T14:32:01+5:302021-12-23T16:40:23+5:30
टेंम्पोतील डिझेल संपले. चालकाने टेम्पो एका साईटला लावला. डिझेल टाकून टेम्पो सुरु केला पण मागे तीव्र उतार असल्याने ब्रेक फेल झाला
पेट्री : सातारा-बामणोली मार्गावरील कास-अंधारी रस्त्याच्या दरम्यान ‘एस’ कॉर्नरवर बुधवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान कमल कराडकर यांच्या तमाशा कलावंतांच्या टेंम्पोचा अपघात झाला. यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत.
याबाबत माहिती अशी की, महाबळेश्वर तालुक्यातील गोगवे व वेंगळे या ठिकाणी तमाशा कार्यक्रम आटपून कऱ्हाडकडे निघाले होते. दरम्यान अंधारी गावच्या जवळ टेंम्पोतील डिझेल संपले. चालकाने टेम्पो एका साईटला लावला. डिझेल टाकून टेम्पो सुरु केला पण मागे तीव्र उतार असल्याने ब्रेक फेल झाला. अन् कास-अंधारी गावाच्या दरम्यान घनदाट जंगलात एस कॉर्नरजवळ ही दुर्घटना घडली.
टेंम्पो (एमएच ११ एम ४५८२) मध्ये पंधरा ते वीस कलाकार होते. त्यापैकी पाचजण किरकोळ जखमी झाले. जखमींना बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेने सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले अशी माहिती बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मोरे यांनी दिली.