पाचवडमध्ये परप्रांतीय कामगाराचा खून; परप्रांतीय संशयित ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:00 AM2019-12-17T11:00:06+5:302019-12-17T11:32:07+5:30
वाई तालुक्यातील पाचवड येथे नव्याने सुरू झालेल्या फरशी विक्री दुकानात कामास असलेल्या दोन परप्रांतीय कामगारांमध्ये सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भांडण झाले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. रंजन मुजुमदार (वय ५५, रा. बायकरा पश्चिम बंगाल) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पाचवड : वाई तालुक्यातील पाचवड येथे नव्याने सुरू झालेल्या फरशी विक्री दुकानात कामास असलेल्या दोन परप्रांतीय कामगारांमध्ये सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भांडण झाले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. रंजन मुजुमदार (वय ५५, रा. बायकरा पश्चिम बंगाल) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पाचवड येथे नव्याने सुरू झालेल्या टाईल्स व फरशी विक्री दुकानामध्ये पश्चिम बंगाल येथील कामगार काम करीत होते. सोमवार मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास या दोघामध्ये भांडण झाले. यावेळी एकाने तेथे असणारे कमोड रंजन यांच्या डोक्यात घातले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शाम बुवा यांनी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याप्रकरणी शुभल देवनाल (रा. चांडपाडा, पश्चिम बंगाल) याला ताब्यात घेतले. भांडणाचे कारण स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.