महिलेची पाच लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:30 AM2021-01-10T04:30:57+5:302021-01-10T04:30:57+5:30
सातारा: सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर एका महिलेस लग्नाचे आमिष दाखवून ५.१८ लाखांची फसवणूक करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील रायपूर येथील जयदीप ...
सातारा: सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर एका महिलेस लग्नाचे आमिष दाखवून ५.१८ लाखांची फसवणूक करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील रायपूर येथील जयदीप खर्डे याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, गोडोली येथे राहणाऱ्या एका ३६ वर्षीय महिलेची आणि जयदीप गणपत खर्डे (वय ३५, मु. पो. रायपूर, ता. चांदवड, जि. नाशिक) याची सोशल मीडियावरून ओळख झाली. जयदीपचे दुसरे लग्न झालेले असतानाही त्याने संबंधित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून ५ लाख १८ हजार रुपये घेतले. जयदीप याच्याकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पैसे मागितले. मात्र, त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर संबंधित महिलेने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन जयदीपच्या विरोधात तक्रार दाखल केली.