लॉकअप तोडून दरोडेखोरांचे पलायन, सहायक पोलीस निरीक्षकांसह पाचजण निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 02:52 PM2022-05-12T14:52:36+5:302022-05-12T16:22:10+5:30
फरारी आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
सातारा : औंध पोलीस ठाण्याच्या कोठडीतून सोमवारी (दि.९) पाच दरोडेखोर पळून गेले होते. याप्रकरणी औंधचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बदे यांच्यासह पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी केली.
खटाव तालुक्यातील औंध पोलीस ठाण्यातून लॉकअप तोडून गंभीर गुन्ह्यातील आरोपी पळाल्यामुळे औंध पोलीस ठाण्यातील कर्मचारी हवालदिल झाले होते. याप्रकारानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. यातील तिघा दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले. मात्र अद्याप दोघे आरोपी फरारी आहेत.
ही घटना घडताच औंध पोलीस शोध मोहिमेसाठी रवाना झाले होते. काही तासात पोलिसांनी तिघा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. तर, फरारी आरोपींचा शोध सुरु आहे.