दुभाजकाला धडकून कार दुस-या कारवर आदळली, 5 जण गंभीर
By admin | Published: April 9, 2017 04:52 PM2017-04-09T16:52:02+5:302017-04-09T16:52:02+5:30
चालकाचा ताबा सुटल्याने कार दुभाजकाला धडकून पलटी घेत दुस-या लेनवरील कारवर जाऊन आदळली.
Next
>ऑनलाइन लोकमत
सातारा(उंब्रज), दि. 9 - चालकाचा ताबा सुटल्याने कार दुभाजकाला धडकून पलटी घेत दुस-या लेनवरील कारवर जाऊन आदळली. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज, ता. क-हाड गावच्या हद्दीत रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दुर्घटनेत कोल्हापूरातील एकाच कुटूंबामधील पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.
विरेंद्र जयंद सावंत (वय २), जयंद रविंद्र सावंत (वय ३२), संजना रविंद्र सावंत (वय ५०), माधुरी जयंद सावंत (वय २७), रविंद्र सावंत (वय ५०, सर्व रा. पाटोळेवाडी, मुक्त सैनिक वसाहत, कोल्हापूर) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत.
अपघात स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूरच्या पाटोळेवाडी येथील सावंत कुटूंबिय रविवारी दुपारी कारने (क्र. एमएच ०९ एएफ ९९९) कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघाले होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कार उंब्रज गावच्या हद्दीत तारळी पुलानजिक आली असता चालकाचा ताबा सुटल्याने कार दुभाजकाला धडकली. त्यानंतर पलटी घेत कार दुसºया लेनवर जाऊन साताºयाहून कºहाडच्या दिशेने येणा-या कारला (क्र. एमएच १२ जेयू ४७९९) धडकली. अपघातात कारमधील सावंत कुटूंबिय गंभीर जखमी झाले. अपघात निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेतली. तसेच महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगिर आगा, अजय भोसले व राजू जाधव त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी जखमींना अपघातग्रस्त कारमधून बाहेर काढून उपचारास कृष्णा रूग्णालयात हलविले. हा अपघात ऐवढा भिषण होता की महामार्गाच्या दोन्ही लेनवर काचांचा खच पडला होता. अपघातात दोन्ही कारचे हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे. अपघाताची नोंद उंब्रज पोलिसांत झाली आहे.
वाहतूक काहीकाळ विस्कळीत
महामार्गावर उंब्रजनजिक तारळी नदीवरील पुलाच्या सुरवातीलाच हा अपघात झाला. अपघातग्रस्त वाहने काहीवेळ महामार्गावरच होती. पुलामुळे वाहतूक वळविण्यासाठी पर्याय नसल्याने अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून बाजूला काढेपर्यंत वाहतूक थांबवून ठेवण्यात आली होती. वाहने बाजूला काढल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली.