सांबर शिकार प्रकरणी पाच जण ताब्यात, वन विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 06:15 PM2021-12-18T18:15:57+5:302021-12-18T18:26:25+5:30
पाटण तालुक्यातील नाव गावातील ग्रामस्थांनी सांबर वन्यप्राण्याची शिकार करून त्याचे मांस शिजवत असल्याची गुप्त माहिती वन्यजीव विभाग हेळवाकला मिळाली होती.
कोयनानगर : सांबराच्या शिकार प्रकरणी नाव गावातील पाच जणांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. वनविभागाने केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. या पाच जणांना पाटण न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत माहिती अशी की, पाटण तालुक्यातील नाव गावातील ग्रामस्थांनी सांबर वन्यप्राण्याची शिकार करून त्याचे मांस शिजवत असल्याची गुप्त माहिती वन्यजीव विभाग हेळवाकला मिळाली. या माहितीवरुन वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचला. यादरम्यान हे ताब्यात घेतलेले हे पाच जण घटनास्थळी सांबराचे मांस शिजवताना आढळले. यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले.
घटनास्थळाहुन शिजत घातलेले मांस व सांबराचे शिंग जप्त केले. तसेच संशयित आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती वन्यजीव विभाग हेळवाकचे वनक्षेत्रपाल संदीप जोपळे यांनी दिली.
आरोपीना काल, शुक्रवार (दि १७) रोजी पाटण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या पाच जणांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.