पाचवड फाटा ते काले रस्त्याची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 04:55 PM2017-09-27T16:55:35+5:302017-09-27T16:58:38+5:30
कºहाड ते चांदोली रस्त्यावर पाचवड फाटा ते कालेटेक रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडल्याने रात्रीच्या अंधारात अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि याच खड्ड्यांमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
उंडाळे (जि. सातारा) 27 : कºहाड ते चांदोली रस्त्यावर पाचवड फाटा ते कालेटेक रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडल्याने रात्रीच्या अंधारात अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि याच खड्ड्यांमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
कºहाड ते चांदोली या मार्गावर दररोज शेकडो वाहने ये-जा करतात. त्याचबरोबर रत्नागिरीला जाण्यासाठी हा मार्ग सोयीस्कर असल्यामुळे या मार्गाचा सर्रास वापरा केला जातो. यामध्ये अवजड वाहने यांचीसुद्धा दररोज वाहतूक होते. दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागते.
गेल्या कित्येक महिन्यांपासून या मार्गावर खड्डे पडून अक्षरश: रस्त्याची चाळण झाली आहे. तर दोन दिवसांपूर्वी पडलेल्या वादळी पावसाने हे खड्डे तुडूंब भरून तलाव झाल्यासारखे दिसत होते. भविष्यात या खड्ड्यांमुळे एखादा अपघात घडल्यास याला जबाबदार कोण? असणार यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे. मात्र, थोड्या दिवसांसाठी बांधकाम विभागाकडून तात्पुरती डागडुजी करून सध्या मुरूमाने खड्डे मुजवून बांधकाम विभाग आपले काम करते.
मात्र, बांधकाम विभागाकडून कायमस्वरूपी तोडगा निघावा म्हणून काहीही काम होत नाही. येथील ठेकेदार हे मलई खाण्याच्या नादात रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे करतात. याचमुळे रस्त्यावर खड्डे मुजवावेत, अशी मागणी वाहनधारकांतून केली जात आहे.