‘शिवयोग’ला पाच हजार साधकांचा सहभाग

By admin | Published: January 30, 2015 09:56 PM2015-01-30T21:56:44+5:302015-01-30T23:17:56+5:30

कऱ्हाडात शेतकरी शिबिर : अवधूतबाबा शिवानंद यांचे मार्गदर्शन

Five thousand seekers participate in 'Shiva Yog' | ‘शिवयोग’ला पाच हजार साधकांचा सहभाग

‘शिवयोग’ला पाच हजार साधकांचा सहभाग

Next

कऱ्हाड : येथील मार्केट यार्डमधील कल्याणी मैदानावर शिवयोग शेतकरी शिबिरास प्रारंभ झाला. गुरुवारी अवधुतबाबा शिवानंद यांनी उपस्थितींना मार्गदर्शन केले. देशभरातील सुमारे पाच हजार साधक या शिबिरात सहभागी असून, शनिवारपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात संजिवनी शक्ती व दुर्गा सप्तशदी बीज मंत्रात्मक साधनेचे ज्ञान व दिक्षा दिली जाणार आहे. बैलबाजार समोरील कल्याणी मैदानावर शिबिरासाठी भव्य शामियाना उभारण्यात आला असून, साधकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कऱ्हाडमध्ये प्रथमच आजोजित केलेल्या या कार्यक्रमास अनुयायांची मोठी गर्दी आहे.अवधुतबाबा शिवानंद म्हणाले, ‘सध्याच्या शेतीमध्ये रासायनिक खते वापरल्याने व औषधांच्या वापराने जमिनीचा पोत कमी झाला आहे. पारंपरिक बी-बियाण्यांचा उपयोग करून शेती उत्पन्नात वाढ करता येईल. संजीवनी शक्ती साधनेने जमीन सुपिक होऊन अनुकूल वातावरण करणे शक्य आहे. जीवनाच्या ऱ्हासास रासायनिक खतांचा वापर कारणीभूत ठरत आहे.’ यावेळी देशभरातून आलेल्या साधकांच्या प्रश्नांना अवधुतबाबा शिवानंद यांनी उत्तरे दिली. (प्रतिनिधी)

आज सांगता --- कऱ्हाडात दोन दिवस सुरू असणाऱ्या शिवयोग शेतकरी शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. शनिवारी याची सांगता होणार असून अवधूतबाबा शिवानंद यांचे सकाळी ९ ते १२ या वेळेत आशिर्वचन होणार असल्याची माहिती गौरी निलाखे यांनी दिली.

Web Title: Five thousand seekers participate in 'Shiva Yog'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.