मुख्यमंत्र्यांच्या फिक्सिंगमुळे बिदाल हुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 11:52 PM2018-04-29T23:52:53+5:302018-04-29T23:52:53+5:30

Fixing of Chief Minister Bidal Hukla | मुख्यमंत्र्यांच्या फिक्सिंगमुळे बिदाल हुकले

मुख्यमंत्र्यांच्या फिक्सिंगमुळे बिदाल हुकले

Next


दहिवडी : ‘माण तालुक्यात जलसंधारणांची कामे झाली आहेत. त्याचप्रमाणे बिदाल गावाने गेल्या वर्षी वॉटरकपमध्ये चांगले काम केले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐनवेळी मॅच फिक्सिंग केली. त्यामुळे बिदालचा नंबर हुकला,’ अशी खंत रासपचे अध्यक्ष व दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर आशी जाहीर कबुली जानकर यांनी व्यक्त दिली.
वॉटरकप स्पर्धेत भाग घेऊन श्रमदान करणाऱ्या भांडवली, मलवडी, आंधळी, कासारवाडी, टाकेवाडी, येळेवाडी, जाधववाडी गावाला मंत्री महादेव जानकर यांनी रविवारी भेट दिली. त्यानंतर जाधववाडी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे अनिल देसाई, मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे, रासपचे भाऊसाहेब वाघ, जिल्हाध्यक्ष मामूशेठ वीरकर, तालुकाध्यक्ष दादासाहेब दोरगे, खंडेराव जगताप, बबन वीरकर, आप्पा पुकळे, महिला आघाडीच्या अध्यक्षा वैशाली वीरकर, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, पाणी फाउंडेशनचे समन्वयक अजित पवार, शिवाजी महानवर, नवनाथ शिंगाडे, विजूशेठ भोसले, प्रवीण मोरे, पिंटू जगदाळे उपस्थित होते.
मंत्री जानकर म्हणाले, ‘मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डिझेलसाठी २५ लाख दिले आहेत. मी आणखी २५ लाख द्यायला सांगतो. शासनकडे नवीन योजनेसाठी पैसे नाहीत. त्यामुळे जुनीच कामे दुरुस्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. माझे अनेक उद्योगपतीशी चांगले संबंध आहेत. त्यांचा सीएसआर फंड मिळविण्यासाठी प्रयत्न करू. मला माण तालुक्याने जन्म दिला तरी मराठवाड्याने मोठे केले. तुमच्या सहकाºयाशिवाय मी केंद्रीय मंत्री होणार. भविष्यात एक दिवस मंत्री बनूनच येणार. पाणी फाउंडेशनच्या कामाला ताकद देण्यासाठी अक्षयकुमार, प्रियांका चोप्रा यांना आणून त्यांच्या पर्स रिकाम्या करू. सातारा-पंढरपूर रस्त्यासाठी बाराशे कोटी टाकले. भविष्यात दौंड-दहिवडी-बारामती-फलटण रेल्वे सुरू व्हावे. फलटणला विमानतळ व्हावे व आमच्या शेतकºयांची वांगे युरोपला जाईल, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. टेंभू योजना मार्गी लागली. भविष्यात वारुगडपासून कारखेलपर्यंत पाणी योजनेपासून वंचित असलेल्या ३२ गावांला पाणी येण्यासाठी प्रयत्न करू.’
जाधववाडीत बहुतांश लोक श्रमदान करुन सकाळी दहाला दुसरीकडे कामाला जातात. पेट्रोल परवडत नाही म्हणून डाळीबांची छाटणीसाठी वाईपर्यंत एकाच गाडीवर ट्रीपलसीट जातात. जिल्हाध्यक्ष मामूंनी लक्षात आणून दिल्यानंतर जानकर यांनी तेल कंपनीच्या अधिकाºयांना निधी देण्याची सूचना केली.
यावेळी मालेगाव आयुक्त संगीता धायगुडे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, अजित पवार, मामूशेठ वीरकर यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच ॠतुजा निंबाळकर यांनी आभार मानले.
प्रत्येक अधिकाºयानं गाव दत्तक घ्यावे
माण तालुक्याला चांगले अधिकारी लाभले आहेत. प्रत्येक अधिकाºयाने एक गाव दत्तक घेतल्यास ६६ गावांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे त्याच्या माध्यमातून २५ बाय १५ या योजनेत अनेक गावांचा समावेश केला जाईल,’ असे आश्वासन दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी दिले.
मंत्री महादेव जानकर यांनी आवाहन करतानच प्रांतधिकारी दादासाहेब कांबळे यांनी येळेवाडी तर गटविकास अधिकारी शेलार यांनी जाधववाडी हे गांव कामासाठी दत्तक घेतले.

Web Title: Fixing of Chief Minister Bidal Hukla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.