प्रतापसिंह उद्यानात ध्वजवंदन समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:44 AM2021-08-13T04:44:51+5:302021-08-13T04:44:51+5:30
रक्तदान शिबिराला प्रतिसाद सातारा : येथील जानाई मळाई शिक्षण संस्थेच्यावतीने झालेल्या रक्तदान शिबिरात १६५ बाटल्या रक्त संकलित केले. शिबिरास ...
रक्तदान शिबिराला प्रतिसाद
सातारा : येथील जानाई मळाई शिक्षण संस्थेच्यावतीने झालेल्या रक्तदान शिबिरात १६५ बाटल्या रक्त संकलित केले. शिबिरास रक्तदात्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शिबिराचे उद्घाटन डॉ. अरुणा बर्गे यांच्याहस्ते झाले. यावेळी संस्थेचे संस्थापक शिवराम माने, संचालक निर्मलसिंग बन्सल, डी. टी. जाधव, वासंती माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात मोफत धान्यवाटप
सातारा : कोरोनाच्या काळात अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. या परिस्थितीत गरीब व गरजूंना राज्य शासन व केंद्र शासनाने आधार दिला आहे. यामध्ये राज्य सरकारने अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबीयांतील लाभार्थींना जिल्हा पुरवठा विभागामार्फत मे महिन्यात ५ हजार ८२ मेट्रिक टन गहू, ३ हजार ३८६ टन तांदूळ वितरित केला. केंद्र सरकारच्यावतीने मे ते जुलैअखेरीस १५ हजार ५०३ टन गहू, तर १० हजार १४३ टन तांदळाचे वाटप करण्यात आले.
वाणिज्य महाविद्यालयात कार्यशाळा
सातारा : धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात ‘आउटकम बेस्ट एज्युकेशन’ या विषयावर नुकतीच कार्यशाळा झाली. कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आले. महाविद्यालयीन अभ्यासक्रम रचना व पुनर्रचना, तसेच मूल्यमापन प्रक्रियेमध्ये शिक्षण क्षेत्रातील आधुनिक विचारप्रणाली याविषयी प्राचार्य डॉ. ए. सी. आत्तार यांनी मार्गदर्शन केले. उपप्राचार्य डॉ. व्ही. के. सावंत यांनी स्वागत केले. समन्वयक डॉ. गणेश जाधव यांनी प्रास्ताविक केले.
पालिका कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप
सातारा : कोरोना कालावधीत दिवस-रात्र स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या सातारा पालिकेच्या ४० कर्मचाऱ्यांप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना नुकतेच रोटरी क्लब ऑफ सातारा व रोटरी क्लब ऑफ सातारा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने रेनकोट देण्यात आले. यावेळी आरोग्य सभापती अनिता घोरपडे, माजी नगरसेवक राम हादगे, आरोग्य अधिकारी शैलेश अष्टेकर, संदीप भागवत, प्रा. डॉ. धनंजय देवी, शशिकांत रसाळ, अॅड. सुधीर ससाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध ग्रंथांचे प्रकाशन
सातारा : कठापूर (ता. कोरेगाव) येथील कवी जगन्नाथ केंजळे यांच्या विविध ग्रंथांचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. कवी केंजळे यांनी आजवर विविध विषयांवर ५१ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. यावेळी श्रीकांत देवधर, जयंत लंगडे, राजेश चिटणीस, विनायक भोसले, सुरक्षा चवरे, संगीता माने, महादेव बोराटे, विठ्ठल शेलार, किसन कदम आदी मान्यवर उपस्थित होते.