पुसेगावात यंदा फ्लेक्समुक्त यात्रा

By admin | Published: December 29, 2015 10:01 PM2015-12-29T22:01:03+5:302015-12-30T00:47:37+5:30

देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायतीचा निर्धार : नेर तलावातील पाणी सोडण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Flex-Free Travel in Pusgaon | पुसेगावात यंदा फ्लेक्समुक्त यात्रा

पुसेगावात यंदा फ्लेक्समुक्त यात्रा

Next

पुसेगाव : श्री सेवागिरी महाराजांच्या वार्षिक यात्रेस येणाऱ्या यात्रेकरुंना योग्यप्रकारे व उत्तम सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी यात्रेशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक विभागाने देवस्थान ट्रस्टशी समन्वय साधत योग्य ते नियोजन करावे, यात्राकालावधीत नेर तलावातील पाणी सोडण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केल्या. दरम्यान, पुसेगावची यात्रा फ्लेक्समुक्त करण्याचा निर्धार यावेळी देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आला.
पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या ६८ व्या पुण्यस्मरणानिमित्त सोमवार, दि. ४ ते गुरुवार, दि. १४ जानेवारी २०१६ या कालावधीत यात्रा भरविण्यात येणार आहे. यात्रेच्या नियोजनासाठी येथील नारायणगिरी सभागृहात जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली व श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय व निमशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, पोलीस उपअधीक्षक एम. राकेश कलासागर, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, जिल्हा परिषद कृषी अधिकारी चांगदेव बागल, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, सुनीलशेठ जाधव, सरपंच दीपाली मुळे, उपसरपंच रणधीर जाधव, तहसीलदार विवेक साळुंखे, गटविकास अधिकारी डॉॅॅ. तानाजीराव लोखंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रा काळात लाखो भाविकांची हजेरी लावतात. यात्रा काळात गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी जादा बंदोबस्त ठेवावा, सीसीटीव्ही कॅमेरे, आपत्कालीन व्यवस्था, नो पार्किंग झोन, मिरवणुकीचा प्लॅन करून वाहतुकीची कोंडी होणार नाही याबाबत पोलीस यंत्रणेने दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्या. यात्रेची व्याप्ती पाहता पुसेगाव सुवर्णनगरीमध्ये येणाऱ्या भाविक, यात्रेकरू व ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण टाळून शुद्धपाणी पुरवठा करावा, रथमार्गातील सर्व अडथळे दूर करावेत, नेर तलावतून येरळा नदीला पाणी सोडणे, यात्रेपूर्वी मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढणे, २४ तास वीज पुरवठा व अधिकाधिक चांगल्या सेवा सुविधा पुरवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी मुदगल यांनी केले. (वार्ताहर)


पोलीस बंदोबस्तात वाढ
यात्रा कालावधीसाठी पोलीस उपविभागीय अधिकारी १, पोलीस निरीक्षक १, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक १२, पोलीस कर्मचारी १२३, महिला कर्मचारी २२, वाहतूक शाखेकडील पोलीस ३०, गृहरक्षक पुरुष २००, महिला १००, पाच आर्मगार्ड, पाच टनी १ गाडी, वायरलेस स्टॅटीक १, हॉकीटॉकी १२, मोठा तंबू १, लहान तंबू ५ याशिवाय मुख्य रथादिवशी जादा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला असल्याची माहिती पुसेगावचे सहायक पोेलीस निरीक्षक सुरेश घाडगे यांनी दिली.

यात्रा कालावधीत वाहतुकीत बदल

यात्रा कालावधीत वाहतूक व्यवस्थेत बदलण्यात येणार आला असून, वहातुकीची कोंडी टाळण्यासाठी साताऱ्याहून दहिवडीकडे जाणाऱ्या गाड्या नेर मार्गे दहिवडी तर वडूज कडून सातारकडे जाणाऱ्या गाड्या विसापूर, खातगुण, जाखणगाव व चौकीचा आंबा मार्गे जाण्याचे नियोजन केले आहे. याशिवाय मुख्य रथादिवशी शुक्रवार, दि. ८ व शनिवार, दि. ९ रोजी पुसेगावमध्ये कोणतेही वाहन आत येऊ दिले जाणार नाही.

रथमार्गाचे डांबरीकरण
सुरक्षेच्या दृष्टीने गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्हीची करडी नजर
यात्रेकरुंना चोवीस तास मुबलक पाणी, वीजेची व्यवस्था
६ रुग्णवाहिका तसेच आरोग्य विभागाची पाच फिरती पथके
८० आरोग्य कर्मचाऱ्यांची यात्रा कालावधीत नेमणूक

Web Title: Flex-Free Travel in Pusgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.