पाटण तालुक्यात पुन्हा पूर परिस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 04:43 PM2019-09-05T16:43:24+5:302019-09-05T16:46:35+5:30
पाटण : पाटण तालुक्यात बुधवारी दुपारनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला असून कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढत चालली आहे. त्यामुळे ...
पाटण : पाटण तालुक्यात बुधवारी दुपारनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला असून कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढत चालली आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून दहा फुटावर ठेवण्यात आले असून एकूण ८७ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला आहे.
पाण्याचा विसर्ग केल्यामुळे कोयना नदीवरील नेरले पूल पाण्याखाली गेला आहे. मोरणा विभागातील ३५ गावांचे दळणवळण ठप्प झाले आहे, तसेच पाटण शहरानजीक असणारा मुळगाव फुल देखील पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
अजूनही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता कोयना धरण व्यवस्थापनाने व्यक्त केली असून धरणाचे दरवाजे बारा फुटापर्यंत उचलून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येईलण् त्यासाठी तालुक्यातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने हाय अलर्टचा इशारा दिला आहे.