पूरग्रस्तांनी खचून जाऊ नये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:38 AM2021-07-29T04:38:18+5:302021-07-29T04:38:18+5:30
तांबवे : तांबवेतील ग्रामस्थांना पावसाळ्यात नेहमीच पुराचा सामना करावा लागतो. तरीही येथील ग्रामस्थ या परिस्थितीला धिराने तोंड देत आहेत. ...
तांबवे : तांबवेतील ग्रामस्थांना पावसाळ्यात नेहमीच पुराचा सामना करावा लागतो. तरीही येथील ग्रामस्थ या परिस्थितीला धिराने तोंड देत आहेत. प्रशासनानेही हे संकट दूर करण्यासाठी योग्य पध्दतीने लवकरात लवकर पंचनामे करावेत. पूरग्रस्तांनी खचून जाऊ नये. महाविकास आघाडी सरकार तुमच्यासोबत असल्याची ग्वाही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
तांबवे (ता. कऱ्हाड) येथे पूरग्रस्त, पडझड झालेल्या ठिकाणांना दिलेल्या भेटीवेळी ते बोलत होते. यावेळी प्रातांधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सह्याद्री सहकारी साखर कारखाना संचालक रामचंद्र पाटील, कोयना बँकेचे संचालक अविनाश पाटील, उपसरपंच विजयसिंह पाटील, माजी सरपंच जावेद मुल्ला, संभाजी पाटील, सदस्य धनंजय ताटे, शंकर पाटील उपस्थित होते.
जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील म्हणाले, तांबवे-सुपने भागात ज्या कुटुंबांना तसेच शेतीला फटका बसलेला आहे, तेथील एकही कुटुंब प्रशासनाने मदतीपासून वंचित ठेवू नये. प्रशासनाने लोकांवर आलेले हे मोठे संकट दूर करण्यासाठी, नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई मिळवून द्यावी.
फोटो : २८ केआरडी ०२
कॅप्शन : तांबवे (ता. कऱ्हाड) येथील पूरग्रस्त भागाची पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पाहणी केली.