फुले दाम्पत्यामुळे स्त्री शिक्षणाचा पाया मजबूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 04:06 AM2021-01-05T04:06:28+5:302021-01-05T04:06:28+5:30
वरकुटे-मलवडी : ‘अत्याचाराला बळी पडलेल्या मुलींना आत्महत्येपासून परावृत्त करून त्यांचे आई-वडिलांच्या मायेनं पालनपोषण करण्याचं पुण्य फुले दाम्पत्याने केले आहे. ...
वरकुटे-मलवडी : ‘अत्याचाराला बळी पडलेल्या मुलींना आत्महत्येपासून परावृत्त करून त्यांचे आई-वडिलांच्या मायेनं पालनपोषण करण्याचं पुण्य फुले दाम्पत्याने केले आहे. प्रतिकूल परिस्थितीत या देशामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सावित्रीबाई फुले होत,’ असे प्रतिपादन मुख्याध्यापिका कल्पना बनसोडे यांनी केले.
वरकुटे-मलवडी येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या प्रांगणात ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या १९० व्या जयंतीच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या लता जाधव, ममता बनसोडे, निकिता बनसोडे, नारायण फडतरे, सचिन होनमाने, सिद्धार्थ बनसोडे, नागेश पोळ, सुनिकेत जगताप, साहिल तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ममता बनसोडे यांंना
सावित्री सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले, तर कुसूम चव्हाण यांना उत्कृष्ट सेवेबद्दल विशेष सत्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात सचिन होनमाने, ममता बनसोडे, निकिता बनसोडे, कोमल मिसाळ यांनी सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवन चरित्रावर विचार मांडले. कार्यक्रमाचे बियांदसिंग जगताप यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विकास जगताप यांनी आभार मानले.
०४वरकुटे मलवडी
फोटो : कुसूम चव्हाण यांना विशेष सत्काराने सन्मानित करताना कल्पना बनसोडे, लता जाधवसह इतर मान्यवर उपस्थित होते.