फुले दाम्पत्यांच्या विचारातूनच सक्षम समाज घडेल
By admin | Published: January 3, 2017 08:11 PM2017-01-03T20:11:13+5:302017-01-03T20:11:13+5:30
‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव आणि महात्मा फुले यांचे जन्मगाव कटगुण ही दोन्ही ठिकाणे आमच्यासाठी श्रद्धास्थाने आहेत.
Next
> आॅनलाईन लोकमत
खंडाळा (सातारा), दि. 3 - ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव आणि महात्मा फुले यांचे जन्मगाव कटगुण ही दोन्ही ठिकाणे आमच्यासाठी श्रद्धास्थाने आहेत. फुले दाम्पत्य ही देशाची संपत्ती असून, सक्षम समाजासाठी त्यांच्या विचारांची कास धरूया,’ असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती खंडाळा व नायगाव ग्रामपंचायत यांच्या वतीने मंगळवारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८६ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी नायगाव येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष नरळे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.