सातारच्या तापमानात होतोय ‘चढ-उतार’...

By admin | Published: February 4, 2015 10:27 PM2015-02-04T22:27:17+5:302015-02-04T23:56:18+5:30

किमान साडेतेरा तर कमाल ३१ अंश सेल्सिअस तापमान

'Fluctuations' happening in Satara temperature ... | सातारच्या तापमानात होतोय ‘चढ-उतार’...

सातारच्या तापमानात होतोय ‘चढ-उतार’...

Next

सातारा : मागील काही दिवसांपासून किमान तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहे. चार दिवसांपूर्वी १६ अंशापर्यंत गेलेले किमान तापमान नंतर मात्र, साडेतेरा अशांपर्यंत खाली आले. तसेच कमाल तापमानही २९ ते ३१ अंशापर्यंत वर-खाली होत आहे. यामुळे नागरिकांना वेगळ्याच वातावरणाचा सामना करावा लागत आहे. परिणामी सर्दी, खोकल्याचे आजार बळावू लागले आहेत.जिल्ह्यात दोन महिन्यांपासून थंडी जाणवत होती. साताऱ्यातील तापमान तर यंदा दहा अंशाच्या खाली आले होते. अनेक दिवस येथील नागरिकांना थंडीचा सामना करावा लागला. यंदा किमान साडेआठ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली उतरले होते. त्यानंतर २६ जानेवारीनंतर थंडी कमी झाली; पण दोनच दिवस कमी थंडीचे वातावरण राहिले. त्यानंतर थंडी वाढली तसेच कमाल तापमानातही फरक पडत गेला. किमान तापमान कधी १६ अंशापर्यंत गेले, तर परत १४ अंशापर्यंत खाली उतरले, अशी स्थिती राहिली. कमाल तापमानातही चढ-उतार होत राहिला. मागील काही दिवसांपासून २९ ते ३१ अंशादरम्यान साताऱ्यातील कमाल तापमान राहिले आहे. नागरिकांना चढ-उताराचा सामना करावा लागत आहे. (प्रतिनिधी)

साताऱ्याचे तापमान
दिनांक किमानकमाल
दि. २५ १५.०२ २९.०६
दि. २६ १४.०२ ३०.०१
दि. २७ १४.०६ ३०.०२
दि. २८ १३.०६ ३०.०१
दि. २९ १४.०० २९.०६
दि. ३० १६.०० २९.०८
दि. ३१ १५.०० ३०.०१
दि. १ १३.०४ ३१.०१
दि. २ १३.०७ ३१.०५
दि. ३१३.०५३१.०१
दि. ४१२.०७३१.०१

Web Title: 'Fluctuations' happening in Satara temperature ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.