किमान तापमानात होतोय चढ-उतार

By admin | Published: February 9, 2015 10:06 PM2015-02-09T22:06:42+5:302015-02-10T00:07:00+5:30

साताऱ्यातील तापमान तर यंदा दहा अंशाच्या खाली आले होते. अनेक दिवस येथील नागरिकांना थंडीचा सामना करावा लागला.

Fluctuations in the minimum temperature | किमान तापमानात होतोय चढ-उतार

किमान तापमानात होतोय चढ-उतार

Next

सातारा : मागील काही दिवसांपासून किमान तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहे. मागील पंधरा दिवसांचे तापमान पाहिले तर काही दिवसांपूर्वी १६ अंशापर्यंत गेलेले किमान तापमान आता १०.०७ पर्यंत खाली आले आहे. यावर्षी सर्वात किमान तापमान हे ९ अंश नोंदले गेले होते. दरम्यान, कमाल तापमान हे स्थिर आहे. ३० ते ३१ अंशापर्यंत वर-खाली हे तापमान होत आहे. यामुळे नागरिकांना वेगळ्याच वातावरणाचा सामना करावा लागत आहे. परिणामी सर्दी, खोकल्याचे आजार बळावू लागले आहेत.
जिल्ह्यात अडीच महिन्यांपासून थंडी जाणवत आहे. साताऱ्यातील तापमान तर यंदा दहा अंशाच्या खाली आले होते. अनेक दिवस येथील नागरिकांना थंडीचा सामना करावा लागला. यंदा किमान साडेआठ ते नऊ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली उतरले होते. त्यानंतर २६ जानेवारीनंतर थंडी कमी झाली; पण दोनच दिवस कमी थंडीचे वातावरण राहिले. त्यानंतर थंडी वाढली तसेच कमाल तापमानातही फरक पडत गेला. किमान तापमान कधी १६ अंशापर्यंत गेले, तर परत १४ अंशापर्यंत खाली उतरले, अशी स्थिती राहिली. मागील दोन दिवसांत तर किमान तापमान हे १२ अंशाच्या खाली आले आहे. गेल्या पंधरा दिवसांत सर्वात कमी तापमानाची नोंद रविवारी झाली. त्यादिवशी किमान तापमान १०.०७ पर्यंत खाली आले होते. तर. सोमवारी सकाळी (दि. ९) ११.०२ तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानातही चढ-उतार होत राहिला आहे. पण, त्यामध्ये फारसा फरक पडलेला नाही. मागील काही दिवसांपासून २९ ते ३१ अंशादरम्यान साताऱ्यातील कमाल तापमान राहिले आहे. मात्र, सोमवारी सकाळी मागील दोन महिन्यांतील कमाल तापमानात वाढ झाल्याचे काहीसे दिसून आले. (प्रतिनिधी)

सातारचे तापमान
किमान कमाल
दि. ५ १२.०४ ३०.०३
दि. ६ १४.०० ३०.००
दि. ७ १२.०२ ३१.०६
दि. ८ १०.०७ ३०.०६
दि. ९ ११.०२ ३१.०८

Web Title: Fluctuations in the minimum temperature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.