म्हसवडच्या माळरानावर चारा छावणी भरली ,जागतिक परिषद ; बारा देशांतील अधिकारी सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 03:49 PM2019-03-18T15:49:02+5:302019-03-18T15:50:30+5:30
माणदेशातील म्हसवडच्या माळरानावर रखरखत्या उन्हात उभारलेल्या चारा छावणीत जागतिकस्तरावरील बैठक पार पडली. याला जनावरांचं हंबरणं अन् गळ्यांच्या गुंगरांच्या पार्श्वसंगीत लाभलं होतं.
म्हसवड : माणदेशातील म्हसवडच्या माळरानावर रखरखत्या उन्हात उभारलेल्या चारा छावणीत जागतिकस्तरावरील बैठक पार पडली. याला जनावरांचं हंबरणं अन् गळ्यांच्या गुंगरांच्या पार्श्वसंगीत लाभलं होतं.
माणदेशातील दुष्काळ पिडीत शेतकऱ्यांना पिक लागवड, त्याच्या संगोपनासह शेतीमाल विक्रीस बाजारपेठ व रास्त बाजारभाव इत्यादी सुविधा देण्याच्या उद्देशाने नाबार्डच्या माध्यमाने शेतकऱ्यांनी माणदेशी किसान उत्पादक कंपनी स्थापन केली.
याच्या बारा देशांतील कृषीक्षेत्रासह इतर नामवंत २४ कंपन्यां सहभागी घेतला. आवश्यक ती मदत करण्याबाबतचा महत्वकांक्षी निर्णय येथील माणदेशी जनावरांच्या चारा छावणीतच झालेल्या बैठकीत सवार्नुमते शिक्कामोर्फत करण्यात आला.
अध्यक्षस्थानी माणदेशी फाउंडेशन व महिला बँकेच्या संस्थापिक अध्यक्षा चेतना सिन्हा होत्या. यावेळी सिंगापूरचे हरिष अगरावाल, भारतातील ओंकार गोंजारी, मयुरेश पुरंदरे, जसमीत वाधवा, संयुक्त अरब अमेरातीचे मरियम अल्मन्सुरी, फिलिपीन्सचे मायरा बकाल्झो, वेनेसा एलियागा, जपानमधील इएजी हरादा, युताका शिमा व युताका ताकाहाशी, हाँगकाँगचे हँडी कुरनियावान, रॉबिन लॉ, अँथनी लाऊ, अमेरिकेतील केथी ली, सिंगापूरचे चुआन चुन सिम, आयलँडचे सियान कोकली, नेदरलॅण्डचे रॉबर्ट वोंक, इंडोनेशियाच्या रुली माईक ओक्टावियाना, मलेशियाचे मी वॉ हॉ, डेनीस लोव, जर्मनीत नदाईन मेनींग, पोलंडचे डेवी वोंक यांच्यासह माणदेशी किसान उत्पादक कंपनीच्या संस्थापिका वनिता पिसे, संचालक प्रभात सिन्हा, सल्लागार वंदना भन्साळी, वनिता शिंदे उपस्थित होत्या.
सिन्हा म्हणाल्या, माणदेशात उपलब्ध पाण्यावर ज्वारी, मका, गहु, कांदा कडधान्य या पिकासोबतच डाळीबाच्या बागाही उत्तमरित्या जोपासतात. परंतु शेती मालास अपेक्षित बाजारभाव मिळत नाही. मोठे आर्थिक मोठे नुकसान होत आहे. परिणामी शेतकरी कर्ज बाजारी होत आहेत. यावर उपाययोजना म्हणुन माणदेशी किसान उत्पादक कंपनीची स्थापना केली आहे.
माणदेशी किसान कंपनीस देश विदेशातील कंपन्यांकडून भांडवली गुंतवणुकीची आवश्यकता नाही. कृषी उद्योगातील कंपन्या असून शेतीसाठी आधुनिक बियाणे, किटकनाशके, पिक लागवड व संगोपन तंत्रज्ञान, बाजार पेठेतील संभाव्य कमी-अधिक बाजारभावाचा अंदाज व त्यानुसार पिक लागवड, विना दलाल थेट बाजारपेठ, लहान मोठे व्यापारी, मॉल याची साखळी तयार करणे आवश्यक आहे.