फलटण तालुक्यात गो-शाळेतील जनावरांसाठी चारा वाटप : सामाजिक उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:27 PM2018-03-19T23:27:18+5:302018-03-19T23:27:18+5:30

फलटण : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहर व तालुक्यात रविवारी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

 Fodder distribution for Go-school animals in Phaltan taluka: Social Activities | फलटण तालुक्यात गो-शाळेतील जनावरांसाठी चारा वाटप : सामाजिक उपक्रम

फलटण तालुक्यात गो-शाळेतील जनावरांसाठी चारा वाटप : सामाजिक उपक्रम

Next
ठळक मुद्देरामराजे नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

फलटण : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहर व तालुक्यात रविवारी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. गो-शाळांमधील जनावरांसाठी चारा वाटप करण्यात आले. रुग्णांना फळेवाटप, मूकबधिर विद्यालय, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचा वाढदिवस विविध कार्यक्रम व हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. रामराजेंना शुभेच्छा देण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

‘लक्ष्मी विलास पैलेस’ या निवासस्थानी सकाळी रामराजेंचे औक्षण त्यांची बहीण सुभद्र्राराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. यावेळी राजघराण्यातील सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, पंचायत समिती सदस्य विश्वजितराजे नाईक-निंबाळकर उपस्थित होते.

त्यानंतर रामराजे यांनी अनंत मंगल कार्यालयात येऊन कार्यकर्ते, हितचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. रामराजे यांना मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस, इतर मंत्री, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार शिवेंद्र्रसिंहराजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, पुण्याचे माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, फलटणच्या नगराध्यक्षा नीता नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोइटे, पंचायत समिती सभापती रेश्मा भोसले, उपसभापती शिवरुपराजे खर्डेकर, फलटण तालुका दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, ‘महानंदा’चे उपाध्यक्ष डी. के. पवार, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे,ज्येष्ठ नेते डॉ. विजयराव बोरावके, सुभाषराव शिंदे, राष्टवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलासराव नलवडे, शहराध्यक्ष मिलिंद नेवसे,भीमदेव बुरुंगले यांनी शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, पंचायत समितेचे सदस्य, विविध गावचे सरपंच, सदस्य, सोसायट्यांचे पदाधिकारी, विविध संस्थानचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी शुभेच्छा दिल्या.पंचायत समिती कार्यालयात मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर झाले. त्यामध्ये रुग्णांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमस्थळीशाही स्वागत
राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महिला आघाडी, विविध सहकारी संस्था, श्रीमंत मालोजीराजे बँक व अन्य संस्था, संघटनांतर्फे कार्यक्रमस्थळी रामराजे यांचे पुष्पवृष्टी करून शाही थाठात स्वागत करण्यात आले.

फलटण येथे रविवारी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केला. यावेळी शाही थाटात पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.

Web Title:  Fodder distribution for Go-school animals in Phaltan taluka: Social Activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.