साताऱ्यातील लोककलावंतांना ‘विद्रोही’तर्फे जीवनावश्यक वस्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:26 AM2021-07-02T04:26:30+5:302021-07-02T04:26:30+5:30
सातारा : महाराष्ट्राची सांस्कृतिक विविधता जपणाऱ्या लोककलावतांना कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक फटका बसला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन ...
सातारा : महाराष्ट्राची सांस्कृतिक विविधता जपणाऱ्या लोककलावतांना कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक फटका बसला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्यावतीने जिल्ह्यातील जवळपास १०० लोककलावंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रच्यावतीने लोककलावंतांना मदत करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील सहानुभूतीधारक देणगीदारांनी आवाहनाला प्रतिसाद दिला. विद्रोही सांस्कृतिक चळवळीकडे जमा झालेल्या मदत निधीतून राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कारी, पाल, सातारा, कुसवडे, आनेवाडी, शिवथर, औंध, उंब्रज, कोर्टी येथील लोककलावंतांना मदत करण्यात आली. आतापर्यंत १०० लोककलावंतांना अन्नधान्य किटचे वाटप केले आहे.
विद्रोहीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. राहुल गंगावणे, महेश गुरव, प्रा. प्रकाश कांबळे, अरुणा लोखंडे, शोभा सरतापे, रोहित क्षीरसागर, रश्मी लोटेकर, शुभम ढाले, संकेत माने, दीपाली भिसे, अम्रीता शिंदे आदी उपस्थित होते.
फोटो दि.०१सातारा विद्रोही फोटो....
फोटो ओळ :
सातारा जिल्ह्यातील लोककलावंतांना विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
\\\\\\\\\\\\\\\\\\\\\