निर्बंध पाळू, पण संचारबंदी नको !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:47 AM2021-07-07T04:47:40+5:302021-07-07T04:47:40+5:30
लॉकडाऊन म्हणून व्यवसाय बंद असल्याने कामगारांचे पगार, कोरोना काळातील लाईट बिल व दुकान भाडे, कर्जाचे हप्ते, व्यापाऱ्यांना असह्य झाले ...
लॉकडाऊन म्हणून व्यवसाय बंद असल्याने कामगारांचे पगार, कोरोना काळातील लाईट बिल व दुकान भाडे, कर्जाचे हप्ते, व्यापाऱ्यांना असह्य झाले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत आता प्रशासनाने पाहू नये. निर्बंध शिथिल करण्यात दिरंगाई केली तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल.
- सुदीप भट्ड, कापड व्यावसायिक
(कोट)
व्यापारी व व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारची मदत सरकारकडून मिळालेली नाही. व्यवसायाच्या हंगामातच कडक लॉकडाऊन लावल्याने व्यापारी आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे. निर्बंध लागू करून प्रसंगी वेळ कमी करून का होईना, पण बाजारपेठ सुरू होणं आता खूप महत्त्वाचं आहे.
- श्रीधर शालगर, होम अप्लायंसेस
(कोट)
कोरोनाचे कारण देऊन प्रशासन व्यापाऱ्यांना किती दिवस वेठीस धरणार? लॉकडाऊनच्या निर्बंधाचा खरच काही उपयोग आहे का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोना किती काळ चालेल हे सांगता येणार नाही. व्यापाऱ्यांचा सहानूभुतीपूर्वक विचार करून प्रशासनाने दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी.
- चंद्रशेखर घोडके, सराफी व्यावसायिक