नियम पाळा, अन्यथा कठोर निर्णय घ्यावे लागतील : बाळासाहेब पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:26 AM2021-06-29T04:26:32+5:302021-06-29T04:26:32+5:30

सातारा : ‘जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी नागरिकांनी शासनाने व जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या ...

Follow the rules, otherwise tough decisions will have to be taken: Balasaheb Patil | नियम पाळा, अन्यथा कठोर निर्णय घ्यावे लागतील : बाळासाहेब पाटील

नियम पाळा, अन्यथा कठोर निर्णय घ्यावे लागतील : बाळासाहेब पाटील

Next

सातारा : ‘जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी नागरिकांनी शासनाने व जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करा, अन्यथा कठोर निर्णय घ्यावे लागतील,’ असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात सोमवारी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कोरोनाचा आढावा घेतला. या वेळी ते बोलत होते.

या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर दराडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करा, अशा सूचना करून पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘बाजारपेठांबरोबर सार्वजनिक ठिकाणी विनामास्क कोणी दिसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा. जिल्ह्यातील उपलब्ध बेडची संख्या, औषधे व रुग्णांना देण्यात येणाऱ्या इतर सेवासुविधांबाबतही माहिती घेतली.’

Web Title: Follow the rules, otherwise tough decisions will have to be taken: Balasaheb Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.