तासवडे एमआयडीसीत दोन कंपन्यांवर अन्न भेसळची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 07:36 PM2019-05-04T19:36:02+5:302019-05-04T19:37:53+5:30
तासवडे, ता. कºहाड येथील सुप्रिम डिस्टीब्युटर्स व ओयासीस बिव्हरेजस या दोन कंपन्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली. या कारवाईत सुमारे ५६ हजार रुपए किंमतीच्या सीलबंद पाण्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या या
सातारा : तासवडे, ता. कºहाड येथील सुप्रिम डिस्टीब्युटर्स व ओयासीस बिव्हरेजस या दोन कंपन्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली. या कारवाईत सुमारे ५६ हजार रुपए किंमतीच्या सीलबंद पाण्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे सीलबंद पाण्याची विक्री करणाºया डिस्टीब्युटर्सचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, सध्या कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यामुळे बाजारात ग्राहकांकडूनसीलबंद पाण्याच्या बाटल्याची मागणीही वाढू लागली आहे. सध्या बाजारात विविध कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्या विक्रीसाठी ठेवल्या जात असतात. परंतू, या पाण्याची गुणवत्ता ग्राहकांना समजून येत नाही. नागरिकांच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने तासवडे येथील मे.सुप्रीम डिस्टीब्युटर्स व ओयासीस बिव्हरेजस या दोन कंपन्यांवर कारवाई करीत सिलबंद पाण्याच्या बॉटल्स तपासणीसाठी जप्त केल्या.
सुप्रिम डिस्टीब्युटर्सच्या सुमारे ४८ हजार ३५२ रूपयांच्या ६ हजार ४४ पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या व मे.ओयासीस बिव्हरेजस या उत्पादक कंपनीच्या ८ हजार ४०० रूपयांच्या १ हजार ३४४ पिण्याच्या पाण्याच्या सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. दोन्ही कंपन्यांच्या सुमारे ५६ हजार ७५२ रूपयांचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी रो.रा.शहा व आर.एम.खंडागळे यांनी केली.