आगाशिव डोंगर पायथ्याला बिबट्याची दहशत कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:27 AM2021-06-25T04:27:34+5:302021-06-25T04:27:34+5:30
मलकापूर : विंग परिसरात बुधवारी बिबट्याचे शेतकऱ्यांना दर्शन झाले. त्यामुळे आगाशिव पायथ्याला बिबट्याचा मुक्काम कायम असल्याचे सिद्ध होत आहे. ...
मलकापूर : विंग परिसरात बुधवारी बिबट्याचे शेतकऱ्यांना दर्शन झाले. त्यामुळे आगाशिव पायथ्याला बिबट्याचा मुक्काम कायम असल्याचे सिद्ध होत आहे. विंग येथील कानिफनाथ मंदिर परिसरात एका शेताच्या बांधावर तो ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. बुधवारी सायंकाळीच एका शेळीच्या कळपातील कोकरावर त्याने हल्ला केला. शेतकऱ्यांनी वेळीच त्यास हुसकावल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
आगाशिव डोंगराभोवतीच्या गावांत अनेकवेळा शेळ्या बिबट्याने ठार केल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत चचेगाव, आगाशिवनगर, जखिणवाडी, धोंडेवाडी, नांदलापूर शिवारात शेतातील वस्तीवरील शेळ्या अनेकवेळा ठार केल्या आहेत. रानातील वस्तीवर बिबट्याने हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. त्यामुळे या परिसरात किमान महिन्यातून एकदा बिबट्याचा हल्ला होण्याचे समीकरणच झाले आहे. आगाशिव डोंगर पायथ्याला मुनावळे गावालगत चार शेळ्या फस्त केल्या होत्या. हा हल्ला एका बिबट्याचा नसून बिबट्यांच्या कळपाचा असावा, असा अंदाज वनविभागाने घटनास्थळी वर्तवला होता.
या अंदाजाप्रमाणे साधारणतः एक वर्षाच्या दोन बछड्यांसह मादी बिबट्याला पाहिल्याचे काही शेतकऱ्यांनी त्यावेळीही सांगितले होते. त्यामुळे या परिसरात बिबट्याच्या कळपाचा वावर आहे हे सिद्ध होत आहे. त्याच पद्धतीने चार दिवसांत नांदलापूरसह कापीलमळा परिसरात दोन बछड्यांसह बिबट्याचा वावर वाढला आहे. या परिसरातील काही शेतकऱ्यांना या बिबट्याच्या कळपाचे दर्शनही झाले आहे. विंग परिसरात मंगळवारी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दर्शन झाले. त्यामुळे बिबट्याचा मुक्काम कायम असल्याचे सिद्ध होत आहे.
पाळीव प्राण्यांवरील हल्ल्याचे सत्र अद्याप सुरूच आहे. अलीकडे दिवसाढवळ्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. शेतकऱ्यांनी त्या पाहिल्या आहेत. मात्र, बुधवारी विंग येथील कानिफनाथ मंदिर परिसरात प्रत्यक्ष दर्शन झाले. एका शेताकडेला बांधावर हंबीरराव शिंदे व त्यांच्या कुंटुबीयांना तो दिसला. अगदी पंधरा ते वीस फुटांवरून एक-दोन मिनिटे तो एकाच ठिकाणी बांधावर उभा होता. त्याची छबी त्यांनी कॅमेराबद्ध केली. त्यावेळी ते चारचाकी गाडीत होते. सुतारकी परिसरात बुधवारी सायंकाळीच एका शेळीच्या कळपातील कोकरावर त्याने हल्लाही केला. मात्र, ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. विंगसह विविध परिसरातही बिबट्याने दहशत निर्माण केली आहे.
सुतारकी वस्ती, कणसे मळा, मसोबा माळ, आदी परिसरात त्याचा वावर नित्याचाच बनला आहे. अशा घटना वारंवार होत असल्यामुळे या परिसरातील शेतकरी रानात जाण्यासाठी धजावत नाहीत. या घटनांवरून गेल्या काही दिवसांपासून डोंगरालगतच्या गावात बिबट्यांचा कळपानेच वावर आहे हे सिद्ध होत आहे. वरचेवर होणाऱ्या दर्शनामुळे डोंगरालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने बिबट्याची दहशत कायम आहे.
१३
विंग येथील कानिफनाथ मंदिर परिसरात बुधवारी बिबट्याचे दर्शन झाले. एका शेताकडेला बांधावर हंबीरराव शिंदे व त्याच्या कुंटुबीयांना तो दिसला.
===Photopath===
240621\img_20210624_184857.jpg
===Caption===
फोटो कॕप्शन
बुधवारी विंग येथील कानिफनाथ मंदिर परिसरात बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले. एका शेताकडेला बांधावर हंबीराव शिंदे व त्याच्या कुंटुबीयाना तो दिसला. अगदी पंधरा ते वीस फूटावरून त्याच्या छबी त्यांनी कॅमेराबध्द केली.