पैसे देण्याची ऐपत नाही म्हणून मित्रासोबत संबंध ठेवण्यास पाडले भाग; फलटण तालुक्यातील धक्कादायक घटना

By दत्ता यादव | Published: January 2, 2023 02:29 PM2023-01-02T14:29:45+5:302023-01-02T14:30:57+5:30

मित्र घरात आला की पती बाहेर जायचा

forced to have a relationship with a friend due to inability to pay shocking incident in phaltan taluka | पैसे देण्याची ऐपत नाही म्हणून मित्रासोबत संबंध ठेवण्यास पाडले भाग; फलटण तालुक्यातील धक्कादायक घटना

पैसे देण्याची ऐपत नाही म्हणून मित्रासोबत संबंध ठेवण्यास पाडले भाग; फलटण तालुक्यातील धक्कादायक घटना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : मित्राने दिलेले पैसे परत करता येत नव्हते. नेहमी तो त्याला पैसे मागायचा. कधी-कधी मित्र त्याच्या घरीही पैसे मागायला यायचा, मग या कटकटीतून सुटण्यासाठी पतीने पत्नीपुढे भलताच प्रस्ताव ठेवला. घरात आलेल्या मित्राला खूश करायचा. तिनं जेव्हा नाही म्हटलं तेव्हा पतीने धमकावून तिला मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलेच. ही धक्कादायक घटना फलटण तालुक्यात घडली आहे.

याबाबत फलटण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित विवाहिता ही २९ वर्षांची आहे. तिच्या पतीने घर बांधण्यासाठी बऱ्याच जणांकडून उसने पैसे घेतले होते. त्यातील काही लोक पैसे मागण्यासाठी घरी येत होते. सायंकाळी पती घरी आल्यानंतर घरी कोण-कोण पैसे मागायला आले ते पत्नी सांगायची. त्यापैकीच एक पतीचा मित्रही नेहमी पैसे मागण्यासाठी घरी यायचा. हे पत्नी पतीला सांगत होती. ‘मी मित्राकडून पैसे घेतले आहेत. परंतु मी त्याला पैसे परत देऊ शकत नाही. असं पती पत्नीला सांगत होता. काही दिवसांनी पतीचा मित्र पुन्हा पैसे मागण्यासाठी घरी आला. त्यावेळी पतीनं मित्रासोबत बोल, असं सांगितलं. तेव्हा पत्नीनं ‘मला त्याच्याशी कशाला बोलायला लावले आहे, असे विचारले असता उलट पतीने तिला मारहाण केली. ‘मी मित्राचे पैसे देऊ शकत नाही. माझ्याजवळ पैसेपण नाहीत. त्यावर मी एक उपाय शोधला आहे,’ असं म्हणून पत्नीला त्यानं मित्रासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास सुचवलं. 

नोव्हेंबर २०२२ आणि डिसेंबर २०२२ या कालावधीत दोनवेळा पतीचा मित्र घरी आला. त्यावेळी त्याच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास पत्नीला भाग पाडले. कळस म्हणजे मित्र घरात आल्यानंतर पती घराबाहेरचा जायचा. या प्रकाराला काही दिवस उलटल्यानंतर तो मित्र पुन्हा पतीला पैसे मागू लागला. त्यामुळे पतीने व घरातील इतर लोकांनी त्या मित्राच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दे, असे तिला सांगितले. पत्नीने नकार देताच पतीने बेल्टने मारहाण केली. सरतेशेवटी हा प्रकार असाह्य झाल्याने पीडित महिलेने फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना आपबिती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी पतीच्या मित्रासह अन्य काहीजणांवर बलात्कारसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: forced to have a relationship with a friend due to inability to pay shocking incident in phaltan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.