वनक्षेत्र ढेबेवाडीत; पण कार्यालय पाटणला !

By admin | Published: February 22, 2015 10:09 PM2015-02-22T22:09:28+5:302015-02-23T00:20:29+5:30

ब्रिटिशकालीन कार्यालय बंद करण्याचा घाट : वन्यप्रेमींमध्ये नाराजी, कार्यालय पाटणला गेल्यास निर्माण होणार अनेक समस्या

Forest areas; But the office is patiala! | वनक्षेत्र ढेबेवाडीत; पण कार्यालय पाटणला !

वनक्षेत्र ढेबेवाडीत; पण कार्यालय पाटणला !

Next

सणबूर : ढेबेवाडी येथील ब्रिटिशकालीन वन कार्यालय कायमस्वरूपी बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. ढेबेवाडी वनविभाग पाटण विभागच्या कार्यालयाशी जोडण्याची चर्चा सुरू असल्याने वन्यप्रेमींच्यात नाराजी व्यक्त होत आहे.पाटण तालुक्यात सध्या पाटण व ढेबेवाडी वनक्षेत्र आहे. ब्रिटिशांनी ढेबेवाडी विभागातील वनांची स्थिती व वनांचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या हेतूने ढेबेवाडी येथे वन परिक्षेत्र कार्यालय स्थापन केले होते. या वनपरिक्षेत्रात उत्तरेकडील मोरणा विभागापासून दक्षिणेला शिराळा तालुक्यातील हद्दीपर्यंत सुमारे ३५ ते ४० किलोमीटरचा परिसर येतो. हजारो हेक्टर क्षेत्राचा या वनपरिक्षेत्रात समावेश आहे. नैसर्गिकरीत्या निर्माण झालेली घनदाट वनराई सुखाचा आनंद देणारी आहे. साग, आंबा, फणस अशी किमती व बहुउपयोगी वनराई हे या विभागाचे वैशिष्ठ्य आहे. बिबट्या, अस्वल, गवे, हरीण, सांबर, मोर, काळविट, साळिंदर अशा अनेक वन्यप्राण्यांचा मुक्त संचार या विभागात मोठ्या प्रमाणात आहे. ही वनसंपत्ती सांभाळण्याचे काम येथील वन कार्यालय चांगल्या पद्धतीने करता येणार आहे. वृक्षाचे संवर्धन व वन्यप्राण्यांचे संगोपन करण्याचे काम ढेबेवाडीचे वन कार्यालय सक्षमपणे करत आहे. (वार्ताहर)


ढेबेवाडीतील वन कार्यालयाचे फायदे
वन्य प्राण्यांकडून शेतीचे नुकसान झाल्यास अथवा जंगली श्वापदांकडून पाळीव प्राण्यावर हल्ले झाल्यास ढेबेवाडी वनविभागाच्या कार्यालयात तातडीने तक्रार दाखल करता येते.
बेकायदा वृक्षतोड अथवा वन्यप्राण्यांची शिकार रोखण्यासाठी या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी कायमच सज्ज असतात.
वनराईला लागलेला वणवा रोखण्यासाठी या कार्यालयातून तातडीने कार्यवाही केली जाते.
कार्यालय बंद झाल्यास ढेबेवाडी विभागातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना वनविभागातील कार्यालयीन कामासाठी पाटणला हेलपाटे घालावे लागणार आहेत. त्यासाठी वेळ आणि पैसे खर्च करावे लागत आहेत.


जनआंदोलन होण्याची चिन्हे
वनविभागाच्या इमारतींच्या नूतनीकरणासाठी लाखो रुपये खर्च झाले. हे वन कार्यालय हलविल्यास या भागातून जनता मोठा उठाव करण्याची चिन्हे आहेत. कार्यालय सुरू राहावे, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे.

शासनस्तरावर वेग
ढेबेवाडी विभागाचे कार्यालय कायमस्वरूपी बंद होणार असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. हे कार्यालय पाटण रेंजला जोडण्याच्या कार्यवाहीला शासनस्तरावर वेग आला आहे. तशा हलचाली सध्या उपवनसंरक्षक सातारा यांच्या कार्यालयातून होत आहेत, अशी माहिती मिळत आहे.
कार्यालयात अनेक पदे
ढेबेवाडीचे वन कार्यालय ढेबेवाडीतच राहावे, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे. ढेबेवाडी वनविभागाच्या कार्यालयात एक रेंजर, दोन वनपाल, क्लार्क, वनरक्षक, वॉचमन अशी पदे आहेत.
ब्रिटिशकालीन ‘रेस्ट हाउस’
प्रतिमहाबळेश्वर असणारे वाल्मीक रेंजच्या कार्यक्षेत्रामध्ये येत आहे. भोसगाव, काळगाव या भागातील जंगल परिसरात विविध ठिकाणी वनविभागाचे क्वॉर्टर्स आहेत. भोसगाव येथे वनविभागाचे ब्रिटिशकालीन रेस्ट हाउस आहे. त्याच्या नूतनीकरणासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत.

Web Title: Forest areas; But the office is patiala!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.